NGC 1427A, an example of an irregular galaxy. It is an Irr-I category galaxy about 52 Mly distant.
एनजीसी १४२७ए (NGC 1427A), ५.२ कोटि प्रकाशवर्षे अंतरावरील आकारहीन दीर्घिका.


An irregular galaxy is a galaxy that does not have a distinct regular shape, unlike a spiral or an elliptical galaxy.[1] The shape of an irregular galaxy is uncommon – they do not fall into any of the regular classes of the Hubble sequence, and they are often chaotic in appearance, with neither a nuclear bulge nor any trace of spiral arm structure.[2]
सर्पिलाकार किंवा लंबवर्तुळाकार दीर्घिकांप्रमाणे निश्चित आकार नसणाऱ्या दीर्घिकांना आकारहीन दीर्घिका (इंग्रजी: Irregular galaxy - इर्रेग्यूलर गॅलॅक्सी) म्हणतात.[1] आकारहीन दीर्घिकांचा आकार असामान्य असतो. ते हबल अनुक्रमाच्या कोणत्याही नियमित गटात बसत नाहीत आणि त्यांच्यामध्ये तेजोगोल ही नसतो व सर्पिलाकार फाटेही नसतात.[2]

Collectively they are thought to make up about a quarter of all galaxies. Some irregular galaxies were once spiral or elliptical galaxies but were deformed by disorders in gravitational pull. Irregular galaxies may contain abundant[3] amounts of gas and dust.
एकूण दीर्घिकांपैकी यांची संख्या एकत्रितपणे एक चतुर्थांश आहे असे मानले जाते. काही आकारहीन दीर्घिका एकेकाळी सर्पिलाकार किंवा लंबवर्तुळाकार होत्या, पण गुरुत्वीय बलातील विषमतेमुळे त्यांचा आकार अनियमित झाला. आकारहीन दीर्घिकांमध्ये विपुल प्रमाणात वायु व धुळ असू शकते.[3] हे बटू (ठेंगण्या) आकारहीन दीर्घिकांसाठी अपरिहार्यपणे खरे नाही.[4]

There are three major types of irregular galaxies:[5]
आकारहीन दीर्घिकांचे तीन मुख्य प्रकार :[5]

An Irr-I galaxy (Irr I) is an irregular galaxy that features some structure but not enough to place it cleanly into the Hubble sequence. Subtypes with some spiral structure are called Sm galaxies Subtypes without spiral structure are called Im galaxies.
आयआरआर-१ (Irr I) दीर्घिका: या प्रकारच्या दीर्घिकेचा आकार थोड्या प्रमाणात रचनाबद्ध असतो, पण हबल अनुक्रमाmadhye वर्गीकरण करण्याएवढा स्पष्ट नसतो . काही प्रमाणात सर्पिलाकार रचना असणाऱ्या उपप्रकाराला एसएम (Sm) दीर्घिका म्हणतात. सर्पिलाकार रचना नसणाऱ्या उपप्रकाराला आयएम (Im) दीर्घिका म्हणतात.

An Irr-II galaxy (Irr II) is an irregular galaxy that does not appear to feature any structure that can place it into the Hubble sequence.
आयआरआर-२ (Irr II) दीर्घिका: या प्रकारच्या दीर्घिकांमध्ये कोणत्याही प्रकारची रचना नसते ज्याच्या आधारे त्यांचे हबल अनुक्रमामध्ये वर्गीकरण करता .

A dI-galaxy (or dIrrs) is a dwarf irregular galaxy[6] This type of galaxy is now thought to be important to understand the overall evolution of galaxies, as they tend to have a low level of metallicity and relatively high levels of gas, and are thought to be similar to the earliest galaxies that populated the Universe. They may represent a local (and therefore more recent) version of the faint blue galaxies known to exist in deep field galaxy surveys.
डीएल-दीर्घिका (dIrrs): ही बटू आकारहीन दीर्घिका आहे.[6 या प्रकारच्या दीर्घिका एकूणच दीर्घिकांच्या उत्क्रांतीचे आकलन होण्यासाठी महत्वाच्या मानल्या जातात, कारण शक्यतो त्यांची मेटॅलिसिटी कमी असते, त्यांच्यामध्ये वायू व धुळीचे प्रमाण तुलनेने जास्त असते आणि या दीर्घिका विश्वातील सर्वात पहिल्या दीर्घिकांसारख्या आहेत असे मानले जाते.

Magellanic Clouds
मॅजेलॅनिक

The Large Magellanic Cloud has since been re-classified as type SBm [7] a type of barred spiral galaxy, the barred Magellanic spiral type. The Small Magellanic Cloud remains classified as an irregular galaxy of type Im under current Galaxy morphological classification, although it does contain a bar structure. Therefore, newer classification schemes place the SMC outside the irregular class as well.
मॅजेलॅनिक ढग दीर्घिकांचे पूर्वी आकारहीन दीर्घिकांमध्ये वर्गीकरण केले जायचे. नंतर मोठ्या मॅजेलॅनिक ढगाचे वर्गीकरण एसबीएम (SBm)[7] या भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिकेच्या एका प्रकारामध्ये करण्यात आले. लहान मॅजेलॅनिक ढगाचे वर्गीकरण आकारहीन दीर्घिका प्रकार आयएम (Im) असेच केले जाते.

See also
हेही

Dwarf galaxy Dwarf elliptical galaxy Peculiar galaxy Galaxy morphological classification
बटू दीर्घिका दीर्घिकांचे संरचनाधारित वर्गीकरण

The location of the Bo Hai.
बोहाई समुद्राचे स्थान

The Bohai Sea or Bo Sea, also known as Bohai Gulf or Bo Gulf (渤海, lit. "Bo Sea"), is the innermost gulf of the Yellow Sea and Korea Bay on the coast of Northeastern and North China. It is approximately 78,000 km2 (30,116 sq. mi) in area and its proximity to Beijing, the capital of the People's Republic of China (PRC), makes it one of the busiest seaways in the world.
बोहाय समुद्र किंवा बो समुद्र हा पिवळा समुद्र आणि कोरिया उपसागराच्या पश्चिमेकडील एक आखात आहे. त्याला बोहायचा आखात (渤海) असेही संबोधले जाते. हा समुद्र चीनच्या उत्तर आणि इशान्य किनारपट्टीवर आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे ७८,००० चौ.कि.मी. आहे. बीजिंग ह्या चीनच्या राजधानीच्या सान्निध्यामुळे हा जगातील सर्वाधिक व्यस्त समुद्रमार्गांपैकी एक आहे.

Until the early 20th century, Bo Hai was often called the Gulf of Chihli (直隸海灣 Zhílì Hǎiwān) or the Gulf of Pechihli or Pechili (北直隸海灣 Běizhílì Hǎiwān). Zhili and Beizhili were historic provinces in the area surrounding Beijing.
२०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत बोहाय समुद्राला अनेकदा चिह्लीचा आखात (直隸海灣) किंवा पीचिह्लीचा आखात (北直隸海灣) असे म्हटले जात. चिह्ली आणि पिचिह्ली हे बीजिंगच्या जवळचे ऐतिहासिक प्रांत होते.

Geography
भूगोल

There are a few important oil reserves in the vicinity of the gulf, including the Shengli Field. Important island groups or islands in the gulf include the Changshan Islands (长山列岛), Changxing Island (长兴岛), and Xizhong Island (西中岛). The PRC provincial-level divisions that have a Bohai Sea coastline are, from the south, going clockwise: Shandong, Hebei, Tianjin, Hebei again, and Liaoning.
बोहाय समुद्र हा ल्याओदोंग आणि षांतोंग द्वीपकल्पांच्या मध्ये असलेल्या चांगशान द्वीपसमूहाने बद्ध आहे. आधुनिक काळात हा एक प्रचंड व्यस्त समुद्रमार्ग झाला आहे. बोहाय समुद्रामध्ये खालीलप्रमाणे तीन मुख्य उपसागर आहेत: दक्षिणेस लायचौ उपसागर, उत्तरेस ल्याओदोंग उपसागर आणि पश्चिमेस बोहाय उपसागर. बोहाय समुद्राच्या पूर्वेच्या टोकाला बोहायची सामुद्रधुनी आहे (渤海海峡). बोहाय समुद्रात ह्वांग हो, हाय, ल्याओ आणि ल्वान ह्या नद्या वाहतात. षंगली तेलक्षेत्रासारखे काही महत्त्वाचे तेलाचे साठे जवळ आहेत. चांगशान द्वीपसमूह, चांगशिंग द्वीपसमूह आणि शिचोंग द्वीप ही समुद्रातील काही महत्त्वाची द्वीपे आहेत. बोहाय समुद्रालगत किनारा असलेले चीनचे प्रांत खालीलप्रमाणे आहेत: षांतोंग, हपै, त्यांजिन आणि ल्याओनिंग.

Major ports
महत्त्वाची बंदरे

There are five major ports along the Bohai Sea rim, with throughputs over 100 million tons:
बोहाय समुद्राच्या किनाऱ्यावर पाच मोठी बंदरे आहेत. ही बंदरे 10 कोटी टन इतक्या प्रामाणाचा व्यापार हाताळतात:

China MSA's Seaways Plan for the Bohai Sea. Planned routes follow closely the seaways currently in use
चीनच्या सरकारची बोहाय समुद्रमार्गांची योजना. नियोजित मार्ग हे वर्तमान मार्गांचेच जवळपास अनुसरण करतात.

Port of Yingkou (营口港) Qinhuangdao Port (秦皇岛港) Port of Tangshan Jingtang (京唐港) Port of Tangshan Caofeidian (曹妃甸港) Tianjin Port (天津港) Port of Huanghua (黄骅港)
यिंगकौचे बंदर (营口港) च्छिन्व्हांगदाओ बंदर (秦皇岛港) तांगषान जिंगतांग बंदर (京唐港) तांगषान त्साओफीदियान बंदर (曹妃甸港) त्यांजिन बंदर (天津港) ह्वांगह्वा बंदर (黄骅港)

Caofeidian and Jingtang are usually treated as one port of statistical purposes. The ports of Dalian and Yantai are also traditionally considered part of the Bohai rim, even though strictly speaking they lie outside the limits of the sea. The Port of Longkou reached 70 million tons of cargo in 2013, and is expected to reach the 100 million ton landmark in the near future.[1]
सांख्यिकीय कारणांसाठी त्साओफीदियान आणि जिंगतांग बंदरांना एकच मानतात. दालियान आणि यांताय ही बंदरे देखील पारंपारिक दृष्ट्या बोहाय प्रणालीत मानतात, परंतु वस्तुतः ती बोहाय समुद्र किनाऱ्यावर नाहीत. २०१३ मध्ये लोंगकौ बंदराने ७ कोटी टनांचा टप्पा गाठला, आणि लवकरच १० कोटी टनांचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा आहे.[1]

Major cities along the Bohai Sea coast
बोहाय समुद्रकिनाऱ्यावरील प्रमुख शहरे

Rocky shore in Dalian, Liaoning Province
ल्याओनिंग प्रांतातील दालियान शहराजवळचा खडकाळ किनारा

Tianjin Dalian, Liaoning Qinhuangdao, Hebei Yantai, Shandong Longkou, Shandong Penglai, Shandong Weihai, Shandong Weifang, Shandong Laizhou, Shandong
त्यांजिन दालियान, ल्याओनिंग च्छिन्ह्वांगदाओ, हपै यांताय, षांतोंग लोंगकौ, षांतोंग पंगलाय, षांतोंग वीहाय, षांतोंग वीफांग, षांतोंग लायचौ, षांतोंग

Hydrocarbon resources
हायड्रोकार्बन संसाधने

The Bohai Bay contains significant oil and gas reserves, providing much of China's offshore production. The main field in the region is named Shengli and has been exploited since the 1960s. It is still producing about half a million barrels a day, but is declining.[2] Production is dominated by Chinese majors (China National Offshore Oil Corporation was mostly created for this region) but foreign companies are also present, like ConocoPhilips,[3] Roc Oil,[4] and others.
बोहाय समुद्रात तेलाचे व नैसर्गिक वायूचे अनेक साठे आहेत, ज्यांचा चीनच्या समुद्री ऊर्जानिर्मितीत लक्षणीय वाटा आहे. षंगली तेलक्षेत्र हे या भागातील मुख्य ऊर्जाक्षेत्र आहे. १९६० सालापासून त्याचा उपयोग सुरु आहे. अद्यापही त्यातून दिवसाला सुमारे ५ लाख बॅरल्स इतकी निर्मिती होते, पण हे प्रमाण कमी होत आहे.[2] बहुतांश ऊर्जानिर्मिती चीनी कंपनया करतात (चायना नॅशनल ऑफशोअर ऑइल क़ाॅर्पोरेशन ही कंपनी मुख्यतः ह्याच प्रदेशाकरिता निर्माण केली गेली), पण कोनोकोफिलिप्स, राॅक ऑइल इ. सारख्या काही परदेशी कंपनया देखील आहेत.

Bohai Sea
बोहाय समुद्र

Oil spills have been reported frequently in this region: three spills occurred in a two-month timeframe in 2011.[7]
ह्या भागात वरचेवर तेलगळती होतात असे निदर्शनास आले आहे. २०११ मध्ये दोन महिन्यांच्या कालावधीत ३ तेलगळतीचे प्रसंग झाले.[7]

Tunnel crossing
बोगदा

In February 2011, the PRC announced that it would build a road and rail tunnel across the Bohai Strait to connect the Liaodong and Shandong peninsulas. When completed, the tunnel would be 106 kilometres (66 mi) long.[8] This plan seems have been superseded as of July 2013, with a modified plan involving a 123-kilometre (76 mi) tunnel between Dalian, Liaoning and Yantai, Shandong.[9]
फेब्रुवारी २०११ मध्ये चीनने बोहाय सामुद्रधुनीच्या आरपार जाणारा ल्याओदोंग आणि षांदोंग प्रांतांना जोडणारा रस्त्याचा आणि रेल्वेचा १०३ कि.मी. लांबीचा बोगदा बांधण्याचे जाहीर केले.[8] २०१३ मध्ये ह्या योजनेत बदल करण्यात आला आणि १२३ कि.मी. लांबीचा दालियान आणि यांताय शहरांना जोडणारा बोगदा बांधण्याचे ठरवण्यात आले.[9]

Image showing the six most common speleothems with labels. Enlarge to view labels.
सर्वसाधारणपणे दिसणारी सहा लेणीरूपे.

A stalactite (UK /ˈstæləktaɪt/, US /stəˈlæktaɪt/; from the Greek stalasso, (σταλάσσω), "to drip", and meaning "that which drips") is a type of formation that hangs from the ceiling of caves, hot springs, or manmade structures such as bridges and mines. Any material which is soluble, can be deposited as a colloid, or is in suspension, or is capable of being melted, may form a stalactite. Stalactites may be composed of amberat, lava, minerals, mud, peat, pitch, sand, and sinter.[1][2] A stalactite is not necessarily a speleothem, though speleothems are the most common form of stalactite because of the abundance of limestone caves.[1][3]
अधोमुखी लवणस्तंभ हा गुहेच्या किंवा पूल, खाणींसारख्या मानवनिर्मित वास्तूंच्या छतावर उगवणाऱ्या भूरूपाचा एक प्रकार आहे. लवणस्तंभ हे खनिजे, चिखल, कोळसा, वाळू, लाव्हारस अशा अनेक पदार्थांपासून बनू शकतात.[1][2] सर्वसाधारणपणे चुनखड्यांच्या गुहांची संख्या बरीच असल्यामुळे ते गुहेत आढळतात, परंतु ते इतरही ठिकाणी दिसू शकतात.[1][3]

The corresponding formation on the floor of the cave is known as a stalagmite.
गुहेच्या तळाशी उगवणाऱ्या अशाच भूरूपाला ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ म्हणतात.

Formation and type
निर्मिती आणि प्रकार

Demonstration of drip stone formation in a lab.
लवणस्तंभाच्या निर्मितीचे प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिक

Limestone stalactites
चुनखडीचे अधोमुखी लवणस्तंभ

The most common stalactites are speleothems, which occur in limestone caves. They form through deposition of calcium carbonate and other minerals, which is precipitated from mineralized water solutions. Limestone is the chief form of calcium carbonate rock which is dissolved by water that contains carbon dioxide, forming a calcium bicarbonate solution in underground caverns.[4] The chemical formula for this reaction is:[5]
सर्वसाधारणपणे अधोमुखी लवणस्तंभ हे चुनखडकाच्या गुहांमध्ये दिसून येतात. पाण्यात विरघळलेल्या चुनखडी आणि इतर खनिजांच्या निक्षेपणापासून ते तयार होतात. चुनखडी म्हणजेच कॅॅल्शियम कार्बोनेट हे कार्बन डायाॅक्साईडयुक्त पाण्यात विरघळते आणि कॅल्शियम बायकार्बोनेटचे द्रावण तयार होतो.[4] ही रासायनिक अभिक्रिया पुढीलप्रमाणॆ आहे.[5]

This solution travels through the rock until it reaches an edge and if this is on the roof of a cave it will drip down. When the solution comes into contact with air the chemical reaction that created it is reversed and particles of calcium carbonate are deposited. The reversed reaction is:[5]
हे द्रावण खडकातून झिरपून जेव्हा एखाद्या गुहेच्या छतातून बाहेर येते, तेव्हा हवेच्या संपर्कामुळे वरील अभिक्रियेच्या बरीबर उलट अभिक्रिया होते, आणि चुनखडीचे कण छतावर साठतात. ही उलट अभिक्रिया पुढीलप्रमाणे आहे.[5]

An average growth rate is 0.13 mm (0.0051 inches) a year. The quickest growing stalactites are those formed by fast-flowing water rich in calcium carbonate and carbon dioxide, these can grow at 3 mm (0.12 inches) per year.[6]
स्तंभ उगवण्याचा सरासरी दर साधारण ०.१३ मि.मी. प्रतिवर्ष इतका असतो. पाण्याचा प्रवाह जलद असेल आणि चुनखडीचे प्रमाण जास्त असेल तर वर्षाला ३ मि.मी. इतक्या वेगाने अधोमुखी लवणस्तंभ वाढू शकतात.[6]

If they become plugged by debris, water begins flowing over the outside, depositing more calcite and creating the more familiar cone-shaped stalactite. The same water drops that fall from the tip of a stalactite deposit more calcite on the floor below, eventually resulting in a rounded or cone-shaped stalagmite. Unlike stalactites, stalagmites never start out as hollow "soda straws."
चुनखडीच्या प्रत्येक अधोमुखी लवणस्तंभाची सुरुवात ही एकाच खनिजयुक्त पाण्याच्या थेंबापासून होते. थेंब खाली पडताना अतिशय बारीक कॅल्साईटचा एक थर साठतो. प्रत्येक थेंब पडताना असेच होते. कालानुसरणाने ह्या प्रक्रियेमुळे एक अतिशय बारीक (०.५ मि.मी.) नळी तयार होते. अशा लवणस्तंभाला 'सोडा स्ट्राॅ' असे संबोधले जाते. ते खूप लांब होऊ शकतात, पण ते अतिशय नाजूक असतात. नळीत गाळ साचून राहिला तर पाणी नळीच्या पृष्ठभागावरून वाहते, ज्यामुळे शंकूच्या आकाराचे अधोमुखी लवणस्तंभ तयार होतात. जे पाण्याचे थेंब अधोमुखी लवणस्तंभाच्या टोकारून खाली पडतात तेच गुहेच्या तळावर देखील कॅल्साइटचा थर साठवतात. यामुळे गोलाकार किंवा शंकूच्या आकाराचे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ गुहेच्या तळावर तयार होऊ लागतात. ऊर्ध्वमुखी लवणस्तंभांच्या अधोमुखी लवणस्तंभांप्रमाणे नळ्या तयार होत नाहीत. कधीकधी अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ एकमेकांना मिळून एकसंध चुनखडीचे स्तंभ तयार होतात.

Lava stalactites
लाव्हारसाचे अधोमुखी लवणस्तंभ

Another type of stalactite is formed in lava tubes while lava is still active inside.[7] The mechanism of formation is similar to that of limestone stalactites. Essentially, it is still the deposition of material on the ceilings of caves, however with lava stalactites formation happens very quickly in only a matter of hours, days, or weeks, whereas limestone stalactites may take up to thousands of years. A key difference with lava stalactites is that once the lava has ceased flowing, so too will the stalactites cease to grow.
लाव्हा नलिकांमध्ये सक्रिय लाव्हारस असल्यास अधोमुखी लवणस्तंभ बनू शकतात.[7] त्यांच्या निर्मितीची यंत्रणा चुनखडीच्या लवणस्तंभांसारखीच असते. परंतु लाव्हारसाचे लवणस्तंभ हे अतिशय वेगाने वाढतात. ते काही तासांत, दिवसांत किंवा आठवड्यांत तयार होतात. याउलट चुनखडीच्या लवणस्तंभांना वाढण्यास हजारो वर्ष लागतात. लाव्हारसाचा प्रवाह थांबल्यावर अधोमुखी लवणस्तंभांची वाढ थांबते. यामुळे तुटलेले लाव्हारसाचे अधोमुखी लवणस्तंभ पुन्हा वाढत नाहीत.[1]

Like limestone stalactites, they can leave lava drips on the floor that turn into lava stalagmites and may eventually fuse with the corresponding stalactite to form a column.
लाव्हारसाचे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ सुद्धा तयार होऊ शकतात. तसेच एकसंध लवणस्तंभही बनू शकतात.

Shark tooth stalactites The shark tooth stalactite is broad and tapering in appearance. It may begin as a small driblet of lava from a semi-solid ceiling, but then grows by accreting layers as successive flows of lava rise and fall in the lava tube, coating and recoating the stalactite with more material. They can vary from a few millimeters to over a meter in length.[8]
शार्कदंताकृती अधोमुखी लवणस्तंभ हे शार्क माशाच्या दातांसारखे रुंद असतात व त्यांना निमुळते टोक असते. एका लहान लाव्हारसाच्या थेंबापासून त्यांची तयार होण्यास सुरुवात होते. लव्हा नलिकेत लाव्हारसाचा प्रवाह जसजसा कमीजास्त होतो तसतसे हे लवणस्तंभ वाढतात. त्यांची लांबी काही मिलिमीटर ते एका मीटरपेक्षा जास्त असू शकते.[8]

Shark tooth stalactites.
शार्कदंताकृती अधोमुखी लवणस्तंभ

Splash stalactites As lava flows through a tube, material will be splashed up on the ceiling and ooze back down, hardening into a stalactite. This type of formation results in a very irregularly shaped stalactite, looking somewhat like stretched taffy. Often they may be of a different color than the original lava that formed the cave.[8]
तुषारनिर्मित अधोमुखी लवणस्तंभ लाव्हा नलिकेततून लाव्हारस वाहत असताना त्याचे तुषार उडून छतावर पडतात. ते थंड होऊन घट्ट झाले की त्यांचे अधोमुखी लवणस्तंभ तयार होतात. ते अनेकदा अनियमित आकाराचे आणि मूळ लाव्हारसाच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचे असतात.[8]

These are common in Hawaiian lava tubes and are often associated with a drip stalagmite that forms below as material is carried through the tubular stalactite and piles up on the floor beneath. Sometimes the tubular form collapses near the distal end, most likely when the pressure of escaping gases decreased and still-molten portions of the stalactites deflated and cooled. Often these tubular stalactites will acquire a twisted, vermiform appearance as bits of lava crystallize and force the flow in different directions.
नलिकाकृती अधोमुखी लवणस्तंभ लाव्हा नलिकेचे छत जेव्हा थंड होत असते तेव्हा त्यावर बंद पापुद्रे तयार होतात. हे पापुद्रे अर्धघनावस्थेत असलेला लाव्हारस आणि वायू आतमध्ये बंदिस्त ठेवतात. बंदिस्त वायू लाव्हारसाला बारीक छेदांमधून बाहेर ढकलतात. यामुळे पोकळ नळीसारखे अधोमुखी लवणस्तंभ तयार होतात. हवाईच्या बेटांवरील लाव्हा नलिकांमध्ये असे अधोमुखी लवणस्तंभ अनेकदा आढळून येतात. नळीतून खाली वाहून तळावर पडणाऱ्या लाव्हारसाच्या थेंबांमुळे तळावर ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ तयार होतात.

Ice stalactites
अधोमुखी बर्फस्तंभ

A common stalactite found seasonally or year round in many caves is the ice stalactite, commonly referred to as icicles, especially on the surface.[9] Water seepage from the surface will penetrate into a cave and if temperatures are below freezing the water will form stalactites. Creation may also be done by the freezing of water vapor.[10] Similar to lava stalactites, ice stalactites form very quickly within hours or days. Unlike lava stalactites however, they may grow back as long as water and temperatures are suitable.
काही गुहांमध्ये बर्फाचे अधोमुखी स्तंभ आढळतात.[9] तापमान द्रवणांकाहून कमी असल्यास झिरपलेल्या पाण्याचे छतातून गळून बाहेर आल्यावर बर्फात रूपांतर होते, ज्यामुळे बर्फाचे स्तंभ तयार होतात. बाष्पाच्या गोठण्यामुळे देखील त्यांची निर्मिती होते.[10] बर्फस्तंभ काही तासांत किंवा दिवसांतच तयार होतात.

Ice stalactites can also form under sea ice when saline water is introduced to ocean water. These specific stalactites are referred to as brinicles.
अधोमुखी बर्फस्तंभ समुद्रावरील बर्फाखाली पण तयार होऊ शकतात. जेव्हा अतिथंड क्षारयुक्त पाण्याचा प्रवाह समुद्राच्या पाण्यात मिसळतो तेव्हा ते तयार होतात.