# mr/Marathi.xml.gz
# quw/Quichua-NT.xml.gz


(src)="b.MAT.1.1.1"> येशु ख्रिस्ताचा कुलवृत्तांत येणेप्रमाणे : तो दाविदाच्या कुळात जन्मला . दावीद अब्राहामाच्या कुळातील होता .
(trg)="b.MAT.1.1.1"> Jesucristo aillu quillca , Davidmanda mirai , David Abrahanmanda mirai .

(src)="b.MAT.1.2.1"> अब्राहाम इसहाकचा पिता होता . इसहाक याकोबाचा पिता होता . याकोब याहूदा व त्याच्या भावांचा पिता होता .
(trg)="b.MAT.1.2.1"> Abrahamba churi Isac aca , Isacpa churi Jacob aca , Jacobpa churiuna Judá aca paihua uquiunandi .

(src)="b.MAT.1.3.1"> यहूदा पेरेस व जेरहाचा पिता होता . ( त्यांची आई तामार होती . ) पेरेस हेस्रोनाचा पिता होता . हेस्रोन रामाचा पिता होता .
(trg)="b.MAT.1.3.1"> Judá churiuna Fares Zarandi aca , Tamarmanda llucshijguna , Farespa churi Esrom aca , Esromba churi Aram aca .

(src)="b.MAT.1.4.1"> रामा अम्मीनादाबाचा पिता होता . अम्मीनादाब नहशोनाचा पिता होता . नहशोन सल्मोनाचा पिता होता .
(trg)="b.MAT.1.4.1"> Aramba churi Aminadab aca , Aminadabpa churi Naason aca , Naasomba churi Salmón aca .

(src)="b.MAT.1.5.1"> सल्मोन बवाजाचा पिता होता . ( बवाजाची आई राहाब होती . ) बवाज ओबेदचा पिता होता . ( ओबेदची आई रूथ होती ) ओबेद इशायचा पिता होता .
(trg)="b.MAT.1.5.1"> Salmomba churi Booz aca , Rahabmanda llucshij , Boozpa churi Obed aca , Rutmanda llucshij , Obedpa churi Isai aca .

(src)="b.MAT.1.6.1"> इशाय दावीद राजाचा पिता होता . दावीद शलमोनाचा पिता होता . ( शलमोनाची आई पूर्वी उरीयाची पत्नी होती . )
(trg)="b.MAT.1.6.1"> Isaihua churi rey apu David aca , rey apu Davidpa churi Salomón aca , Uriaspa huarmimanda llucshij .

(src)="b.MAT.1.7.1"> शलमोन रहबामचा पिता होता . रहबाम अबीयाचा पिता होता . अबीया आसाचा पिता होता .
(trg)="b.MAT.1.7.1"> Salomomba churi Roboam aca , Roboamba churi Abías aca , Abíaspa churi Asa aca .

(src)="b.MAT.1.8.1"> आसा यहोशाफाटाचा पिता होता . यहोशाफाट योरामाचा पिता होता . योराम उज्जीयाचा पिता होता .
(trg)="b.MAT.1.8.1"> Asajpa churi Josafat aca , Josafatpa churi Joram aca , Joramba churi Uzías aca .

(src)="b.MAT.1.9.1"> उज्जीया योथामचा पिता होता . योथाम आहाजचा पिता होता . आहाज हिज्कीयाचा पिता होता .
(trg)="b.MAT.1.9.1"> Uzíaspa churi Jotam aca , Jotamba churi Acaz aca , Acazpa churi Ezequías aca .

(src)="b.MAT.1.10.1"> हिज्कीया मनश्शेचा पिता होता . मनश्शे आमोनचा पिता होता . आमोन योशीयाचा पिता होता .
(trg)="b.MAT.1.10.1"> Ezequíaspa churi Manases aca , Manasespa churi Amón aca , Amomba churi Josías aca .

(src)="b.MAT.1.11.1"> योशीया यखन्या व त्याचे भाऊ यांचा पिता होता . ( जेव्हा यहूदी लोकांना गुलाम म्हणून बाबेलास नेण्यात आले तेव्हा हे झाले . )
(trg)="b.MAT.1.11.1"> Josíaspa churiuna Jeconías aca paihua uquiunandi , Babilonia llactama apashca horas .

(src)="b.MAT.1.12.1"> त्यांना बाबेलला नेण्यात आल्यानंतरचा कुलवृत्तांत येणेप्रमाणे : यखन्या शल्तीएलचा पिता होता . शल्तीएल जरूब्बाबेलचा पिता होता .
(trg)="b.MAT.1.12.1"> Babiloniama apashca huasha , Jeconíaspa churi Salatiel aca , Salatielba churi Zorobabel aca .

(src)="b.MAT.1.13.1"> जरूब्बाबेल अबीहूदचा पिता होता . अबीहूद एल्याकीमचा पिता होता . एल्याकीम अज्जुराचा पिता होता .
(trg)="b.MAT.1.13.1"> Zorobabelba churiuna Abiud aca , Eliaquindi , Eliaquimba churi Azor aca .

(src)="b.MAT.1.14.1"> अज्जुर सादोकचा पिता होता . सादोक याखीमचा पिता होता . याखीम एलीहूदचा पिता होता .
(trg)="b.MAT.1.14.1"> Azorba churi Sadoc aca , Sadocpa churi Aquim aca , Aquimba churi Eliud aca .

(src)="b.MAT.1.15.1"> एलीहूद एलाजारचा पिता होता . एलाजारचा मत्तानचा पिता होता . मत्तान याकोबाचा पिता होता .
(trg)="b.MAT.1.15.1"> Eliudpa churi Eleazar aca , Eleazarba churi Matan aca , Matamba churi Jacob aca .

(src)="b.MAT.1.16.1"> याकोब योसेफाचा पिता होता . योसेफ मरीयेचा पती होता . मरीया येशूची आई होती . येशूला ‘ ख्रिस्त ’ म्हटले आहे .
(trg)="b.MAT.1.16.1"> Jacobpa churi José aca , Josega María cari aca .
(trg)="b.MAT.1.16.2"> Maríamanda Cristo nishca Jesús pagarimuca .
(trg)="b.MAT.1.16.3"> Cristo Dios ajllashca nin .

(src)="b.MAT.1.17.1"> याप्रमाणे अब्राहामापासून दाविदापर्यत चौदा पिढ्या झाल्या आणि दाविदापासून बाबेलच्या बंदीवासापर्यंत चौदा पिढ्या झाल्या . बाबेलच्या बंदिवासापासून ख्रिस्ताच्या जन्मापर्यत चौदा पिढ्या झाल्या . ( लूका2.1-7 )
(trg)="b.MAT.1.17.1"> Shinajpi , Abrahanmanda Davidgama chunga chuscu cuti mirashcauna tianauca .
(trg)="b.MAT.1.17.2"> Davidmanda Babiloniama apanagama chunga chuscu miraiguna tiaca .
(trg)="b.MAT.1.17.3"> Babiloniama apashcamanda Cristogama chunga chuscu miraiguna aca .

(src)="b.MAT.1.18.1"> येशू ख्रिस्ताच्या आईचे नाव मरीया होते आणि येशू ख्रिस्ताचा जन्म अशाप्रकारे झाला . मरीयेचे योसेफशी लग्न ठरले होते . परंतु त्या अगोदरच ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती आहे असे दिसून आले .
(trg)="b.MAT.1.18.1"> Jesucristo pagarina casnami aca .
(trg)="b.MAT.1.18.2"> Paihua mama María , Josehua pactachishca asha , manaraj llutarijllaira , huahuara tupaca icsai , Santo Espiritumanda .

(src)="b.MAT.1.19.1"> तिचा भावी पती योसेफ चांगला मनुष्य होता . तिची लोकांमध्ये बदनामी होऊ नये म्हणून त्याने गुपचूप तिला सूटपत्र देण्याचा विचार केला .
(trg)="b.MAT.1.19.1"> Paihua cari José , ali shungu runa asha , huarmi ama manali rimashca achu nisha , pacalla pacalla paita saquinara iyaca .

(src)="b.MAT.1.20.1"> पण असे विचार त्याच्या मनात घोळत असतानाच देवाच्या दूताने स्वप्नात त्याला दर्शन दिले आणि सांगितले , “ दाविदाच्या वंशातील योसेफा , मरीयेशी लग्न करण्यास अनमान करू नकोस कारण तिला होणारे मूल पवित्र आत्म्यापासून होणार आहे .
(trg)="b.MAT.1.20.1"> Casna iyasha tiaushcai , shu Diosmanda ángel paita ricurimuca , pai puñusha nuspaushcai .
(trg)="b.MAT.1.20.2"> Angel paita nica : José , Davidpa Churi , ama manzhaichu camba huarmi Mariara apingaj .
(trg)="b.MAT.1.20.3"> Paihua icsai tupashca huahuaga Santo Espiritumandami .

(src)="b.MAT.1.21.1"> त्याचे नाव तू येशू4 ठेव . कारण तो त्याच्या लोकांची पापापासून सुटका करील . ”
(trg)="b.MAT.1.21.1"> Shu churira pagarichinga , paita shutichingui Jesús , paihua runaunara quishpichinga paiguna uchaunamanda .

(src)="b.MAT.1.22.1"> हे सर्व यासाठी घडले की , प्रभुने संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते , त्याची पूर्तता व्हावी .
(trg)="b.MAT.1.22.1"> Cai tucui tucuca , Señorba rimashca shimiuna pactaringaj , profeta nishca Diosmanda rimaj rimashcasna .

(src)="b.MAT.1.23.1"> “ कुमारी गर्भवती होईल , ती एका मुलाला जन्म देईल आणि ते त्याला ‘ इम्मानुएल ’ म्हणजे ‘ आमच्याबरोबर देव आहे ’ असे म्हणतील . ”
(trg)="b.MAT.1.23.1"> Shu huanra huarmi huahuara taringami , shu churira pagarichingami .
(trg)="b.MAT.1.23.2"> Paita Emanuel nishca shutichingui .
(trg)="b.MAT.1.23.3"> Cai shuti nin : Dios ñucanchihuami .

(src)="b.MAT.1.24.1"> जेव्हा योसेफ जागा झाला तेव्हा देवदूताने जशी त्याला आज्ञा केली होती तसेच त्याने केले , त्याने मरीयेशी लग्र केले .
(src)="b.MAT.1.24.2"> 25पण तिने मुलाला जन्म देईपर्यत त्याने तिला जाणले नाही . आणि योसेफने त्याचे नाव येशू ठेवले .
(trg)="b.MAT.1.24.1"> José pai nuspashcamanda lliccharisha Señorba ángel rimashcasna rasha , paihua huarmira apica .

(src)="b.MAT.2.1.1"> यहूदीयातील बेथलहेम गावात येशूचा जन्म झाला . त्यावेळी हेरोद राजा राज्य करीत होता . येशूच्या जन्मानंतर पूर्वेकडून काही ज्ञानी लोक यरूशलेमाला आले .
(trg)="b.MAT.2.1.1"> Jesús Judea partii tiaj Belén llactai pagarimushca horas , Herodes rey apu tiashcai , indi llucshina partimanda huaquin yachajguna Jerusalenma shamunauca .

(src)="b.MAT.2.2.1"> आणि त्यांनी विचारले , “ यहूद्यांचा नुकताच जन्मलेला राजा कोठे आहे ? कारण त्याचा जन्म सूचित करणारा तारा आम्ही पूर्व दिशेस पाहिला म्हाणून त्याला नमन करण्यास आलो आहोत . ”
(trg)="b.MAT.2.2.1"> ¿ Maibira pagarishcai judioguna rey apu ? ninauca .
(trg)="b.MAT.2.2.2"> Paihua estrellasta ricushcanchi indi llucshina partii .
(trg)="b.MAT.2.2.3"> Paita adorangaj shamushcanchi .

(src)="b.MAT.2.3.1"> हे ऐकून हेरोद राजा तसेच यरुशलेम नगराचे रहिवासी घाबरुन गेले .
(trg)="b.MAT.2.3.1"> Herodes rey apuga caita uyasha turbarica , tucui Jerusalen llactandi .

(src)="b.MAT.2.4.1"> मग त्याने यहूदी लोकांचे सर्व मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांना बोलाविले आणि विचारले की , “ ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार होता ? ”
(trg)="b.MAT.2.4.1"> Herodes tucui sacerdote apuunara , runaunamanda yachaira yachachijgunaras cayasha , paigunara tapuca : ¿ Cristoga maibira pagarina acai ? nisha .

(src)="b.MAT.2.5.1"> त्यांनी उत्तर दिले , “ यहूदीयातील बेथलेहेम गावात . कारण देवाच्या संदेष्टयांनी त्याविषयी असे लिहिले आहे की :
(trg)="b.MAT.2.5.1"> Paiguna ninauca : Judeamanda Belembi ; Diosmanda rimaj casnami quillcashca :

(src)="b.MAT.2.6.1"> “ हे बेथलहेमा , यहूद्यांच्या भूमिप्रदेशा , तू यहूद्यांच्या राज्यकर्त्यामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील , असा राज्यकर्ता तुझ्यातून येईल . ” ‘ मीखा 5 : 2
(trg)="b.MAT.2.6.1"> Can Belén , Judea partii tiaj , Judá apuunamanda mana yali ichillachu angui .
(trg)="b.MAT.2.6.2"> Canmanda shu pushaj runa llucshinga , ñuca aillu Israelda cuirangaj .

(src)="b.MAT.2.7.1"> मग हेरोदाने पूर्वेकडील ज्ञानी लोकांची गुप्तपणे भेट घेतली आणि तारा दिसल्याची नक्की वेळ माहीत करून घेतली .
(trg)="b.MAT.2.7.1"> Shinajpi Herodes chi yachajgunara pacalla pacalla cayasha , paigunamanda ali tapucami estrellas ricurishca tiempora .

(src)="b.MAT.2.8.1"> नंतर त्याने त्यांना बेथलहेमला पाठविले . हेरोद त्यांना म्हणाला , “ तुम्ही जाऊन त्या बालकाचा नीट शोध करा . आणि तुम्हांला ते सापडल्यावर मला सांगायला या . म्हणजे मी सुद्धा जाऊन त्याला नमन करू शकेन . ”
(trg)="b.MAT.2.8.1"> Paigunara cachaca Belén llactama , Chima richi , nisha , huahuamanda sumajlla tapuichi .
(trg)="b.MAT.2.8.2"> Paita tarishaga cuentahuaichi , ñuca shinallara shamusha huahuara adorangaj .

(src)="b.MAT.2.9.1"> ज्ञानी लोकांनी राजाचे म्हणणे ऐकले व ते निघाले , त्यांनी जो तारा पूर्वेला होता तोच त्यांना परत दिसला . ज्ञानी लोक त्या ताऱ्याच्या मागे गेले . जेथे बाळ होते ते ठिकाण येईपर्यंत तारा त्यांच्यासमोर जात होता . मग त्या ठिकाणावर तो थांबला .
(trg)="b.MAT.2.9.1"> Paiguna rey apura uyashca huasha rinaucami .
(trg)="b.MAT.2.9.2"> Indi llucshina partii ricushca estrellas paiguna ñaupajpi rica pactai ringama , shinajpi huahua tiaushca huasi ahuai shayarica .

(src)="b.MAT.2.10.1"> ज्ञानी लोकांना ते पाहून फार आनंद झाला .
(trg)="b.MAT.2.10.1"> Estrellasta ricusha cushiyanauca ashcara .

(src)="b.MAT.2.11.1"> ज्ञानी लोक बाळ होते त्या गोठ्यात आले . त्यांनी बाळ व त्याची आई मरीया हिला पाहिले . त्यांनी लवून त्या बालकाला नमन केले . नंतर त्यांनी बाळासाठी आणालेल्या भेटवस्तु काढल्या . त्यांनी बाळाला सोने , ऊद व गंधरस ह्या बहुमोल वस्तु दिल्या .
(trg)="b.MAT.2.11.1"> Huasii icusha huahuara ricunauca paihua mama Mariandi .
(trg)="b.MAT.2.11.2"> Tuama urmasha , huahuara adoranauca .
(trg)="b.MAT.2.11.3"> Paiguna valijgunara pascasha , huahuara cunauca curiras , incienso nishca gusto asnaj ambiras , mirra nishca asnaj iraras .

(src)="b.MAT.2.12.1"> पण देवाने स्वप्नाद्वारे त्या ज्ञानी लोकांना सावध केले आणि हेरोदाकडे परत जाऊ नका असे सांगिले . तेव्हा ते ज्ञानी लोक वेगव्व्या मार्गाने आपल्या देशास परतले .
(trg)="b.MAT.2.12.1"> Astaun , nuspashcaunai rimashca aca ama tigrangaj Herodesma , paiguna rinauca shu nambira .

(src)="b.MAT.2.13.1"> ज्ञानी लोक गेल्यानंतर , प्रभूचा दूत स्वप्नात येऊन योसेफाला म्हणाला , “ ऊठ ! बालकाला आणि त्याच्या आईला घेऊन निसटून इजिप्त देशास जा . कारण बाळाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध घेणार आहे , तेव्हा मी तुला धोका टळल्याची सूचना देईपर्यंत इजिप्तमध्येच राहा . ”
(trg)="b.MAT.2.13.1"> Paiguna rishca huasha , shu Señormanda ángel ricurimuca Josema pai nuspashcaunai , paita nisha : Atari , huahuara paihua mamandi pushari , Egipto nishca llactama miticuiri .
(trg)="b.MAT.2.13.2"> Chihui chapai ñuca canda rimanagama .
(trg)="b.MAT.2.13.3"> Herodes huahuara mascangami huañuchingaj .

(src)="b.MAT.2.14.1"> तेव्हा तो उठाला व रात्रीच बाळाला व त्याच्या आईला घेऊन इजिप्त देशास गेला .
(trg)="b.MAT.2.14.1"> Pai lliccharisha , tuta huahuara paihua mamandi pushasha , Egipto llactama rinauca .

(src)="b.MAT.2.15.1"> आणि हेरोद मरेपर्यंत तेथेच राहिला . प्रभु देवाने संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते की , ‘ मी माझ्या मुलाला इजिप्त देशातून बोलाविले आहे ’ ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले .
(trg)="b.MAT.2.15.1"> Chihui tianauca Herodes huañunagama , Señor rimashcara pactachingaj , Diosmanda rimaj rimashcasna : Egiptomanda ñuca Churira cayacani .

(src)="b.MAT.2.16.1"> तेव्हा ज्ञानी लोकांनी आपल्याला फसविले , हे पाहून हेरोद अतिशय रागावाला . त्याने ज्ञानी लोकांकडून त्या बालकाच्या जन्माची वेळ नीट समजून घेतली होती . त्यानुसार बालक जन्मल्याला आता दोन वर्षे उलटली होती . म्हणून त्याने माणसे पाठवून बेथलहेम व त्याच्या आसपासच्या प्रदेशातील दोन वर्षाच्या व त्याहून कमी वयाच्या मुलांची कत्तल करण्याची आज्ञा केली .
(trg)="b.MAT.2.16.1"> Shinajpi Herodes yachajguna paita umachinaupi ricusha , ashcara piñarisha , huahuaunara huañuchingaj cachaca , tucui ichilla cari huahuanara , ishqui huata tupumanda pishiunara , Belembi tiajgunara , chi rayai tiajgunaras , yachajguna rimashca tiempomanda yupasha .

(src)="b.MAT.2.17.1"> यिर्मया संदेष्ट्यांच्या द्वारे देवाने जे सांगितले होते ते अशा प्रकारे पूर्ण झाले . ते वचन असे होते :
(trg)="b.MAT.2.17.1"> Chi horasllai Jeremías nishca Diosmanda rimaj rimashca shimi pactarica , pai nishca :

(src)="b.MAT.2.18.1"> रामा येथे आकांत ऐकू आला . दु : खदायक रडण्याचा हा आकांत होता . राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे , पण तिचे सांत्वन करणे अशक्य झाले कारण तिची मुले मरण पावली आहेत . ” यिर्मया 31 : 15
(trg)="b.MAT.2.18.1"> Rama nishca llactai shimi uyarica , Atun caparina , atun huacai , atun llaquirina , Raquel paihua churiunamanda huacasha .
(trg)="b.MAT.2.18.2"> Cariyanara mana munacachu paiguna huañushcamanda .

(src)="b.MAT.2.19.1"> हेरोद मेल्यांनंतर प्रभुचा दूत स्वप्नात योसेफाकडे आला . योसेफ जेव्हा इजिप्तमध्ये होता तेव्हा हे घडले .
(trg)="b.MAT.2.19.1"> Shinashas , Herodes huañushca huasha , Señorba ángel cuti ricurimuca Josera pai nuspashcaunai , Egipto llactai .

(src)="b.MAT.2.20.1"> दूत म्हणाला “ ऊठ ! बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास जा . जे लोक बाळाला मारू पाहत होते ते आता मेले आहेत . ”
(trg)="b.MAT.2.20.1"> Atari , nica , huahuara paihua mamandi pushari , Israel llactara ri .
(trg)="b.MAT.2.20.2"> Huahuara huañuchingaj niuguna ña huañunaushcami .

(src)="b.MAT.2.21.1"> मग योसेफ बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास गेला .
(trg)="b.MAT.2.21.1"> Shinajpi atarica , huahuara paihua mamandi pushaca .
(trg)="b.MAT.2.21.2"> Israel llactama shamuca .

(src)="b.MAT.2.22.1"> हेरोदाच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा अर्खेलाव यहूदाचा राजा झाला आहे असे जेव्हा योसेफाला समजले , तेव्हा तो तेथे जाण्यास घाबरला . पण स्वप्नात त्याला ताकीद मिळाल्याने तो तेथून निघाला आणि गालील प्रदेशात आला .
(trg)="b.MAT.2.22.1"> Josega , Arquelao nishca Judea partii rey apu tucushcara uyashaga , paihua yaya Herodes randimanda , chima rinara manzhacami .
(trg)="b.MAT.2.22.2"> Astaun nuspashcaunai uyasha , pai Galilea partima rica .

(src)="b.MAT.2.23.1"> योसेफ नासरेथ नावाच्या गावात गेला आणि तेथे राहिला . ख्रिस्त नासरेथकर म्हटला जाईल , असे जे देवाने संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणूल हे झाले .
(trg)="b.MAT.2.23.1"> Nazaret nishca llactama pactamuca chihui tiangaj , Diosmanda rimajguna rimashcara pactachingaj , casna nisha : Pai Nazaret runa nishca anga .

(src)="b.MAT.3.1.1"> त्या दिवसांत बाप्तिस्मा करणारा योहान आला आणि यहूदीयाच्या वैराण प्रदेशात उपदेश करू लागला ; तो म्हणाला ,
(trg)="b.MAT.3.1.1"> Chi punzhaunai Bautisaj Juan Judeai tiaj runa illashca partima rimaj shamuca .

(src)="b.MAT.3.2.1"> “ तुमची अंत : करणे व जीवने वाईटपणाकडून चांगुलपणामध्ये बदला कारण स्वर्गाचे राज्य जवळ येत आह्रे ”
(trg)="b.MAT.3.2.1"> Arrepentirichi , nica , ahua pacha mandana mayanllayashcami .

(src)="b.MAT.3.3.1"> यशया हा संदेष्टा ज्याच्याविषयी बोलत होता तो हाच बाप्तिस्मा करणारा योहान . त्याविषयीचे यशयाचे भविष्य असे होते : “ वैराण प्रदेशात एक मनुष्य ओरडून सांगत आहे ; ‘ प्रभु देवासाठी मार्ग तयार करा , त्याच्या वाटा सरळ करा . ” ‘ यशया 40 : 3
(trg)="b.MAT.3.3.1"> Caimi Isaías nishca Diosmanda rimaj rimaushca , nisha : Caparij shimi , runa illashca partii caparisha : Señor purina nambira alichichi , paihua ñambiunara dirichuichi .

(src)="b.MAT.3.4.1"> योहानाचे कपडे उंटाच्या केसांपासून बनविलेले होते . कातड्याचा कमरपट्टा त्याच्या कमरे भोवती होता . अन्न म्हणून योहान टोळ आणि रानमध खात असे .
(trg)="b.MAT.3.4.1"> Juan camello nishca illmahua ahuashcara churarishca aca , cara chumbillinahua chumbillishca aca .
(trg)="b.MAT.3.4.2"> Atun ijiunara sacha mishquiras micuj aca .

(src)="b.MAT.3.5.1"> लोक योहानाचा उपदेश ऐकण्यास जात होते . यरूशलेम , सर्व यहूदीया प्रांत आणि यार्देन नदीच्या भोवतालच्या प्रदेशातून लोक येत होते .
(trg)="b.MAT.3.5.1"> Paihuajma shamunauca Jerusalenmanda tucui Judeamanda , tucui Jordan rayai tiaj partiunamanda .

(src)="b.MAT.3.6.1"> आपण केलेली पापे लोक त्याला सांगत होते आणि योहान त्यांना यार्देन नदीत बाप्तिस्मा देत होता .
(trg)="b.MAT.3.6.1"> Juan paigunara bautisaca Jordan yacui , paiguna ucharashcaunara cuentajpi .

(src)="b.MAT.3.7.1"> योहान जेथे लोकांना बाप्तिस्मा देत होता तेथे अनेक परूशी आणि सदूकी आले . जेव्हा योहानाने त्यांना पाहिले तेव्हा तो त्यांना म्हणाला , “ अहो , सापाच्या पिल्लांनो , देवाचा जो राग ओढवणार आहे त्याच्यापासून दूर पळण्याचे तुम्हांला कोणी सुचविले ?
(trg)="b.MAT.3.7.1"> Ashca fariseo nishcauna saduceo nishcaunandi paihuajma shamujta ricusha , Juan paigunara nica : Machacuimanda miraiguna , ¿ pi cangunara yachachica shamuj piñarishcamanda miticungaj ?

(src)="b.MAT.3.8.1"> म्हणून पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या .
(trg)="b.MAT.3.8.1"> Arrepentirina tonora raichi .

(src)="b.MAT.3.9.1"> अणि ‘ अब्राहाम माझा पिता आहे . ’ अशी फुशारकी तुम्हांला मारता येईल असे समजू नका ; मी तुम्हांस सांगतो की , देव अब्राहामासाठी या दगडापासून मुले निर्माण करू शकतो .
(trg)="b.MAT.3.9.1"> Ama iyaichichu canguna quiquin shungüi ningaj : Abrahanga ñucanchi yaya , nisha .
(trg)="b.MAT.3.9.2"> Cangunara nini , Dios cai quiquin rumiunamanda churiunara Abrahambajta sicachinara ushanmi .

(src)="b.MAT.3.10.1"> झाडे तोडण्यासाठी कुऱ्हाड तयार आहे . चांगले फळ न देणारे प्रत्येक झाड कापून अग्नीत टाकले जाईल .
(trg)="b.MAT.3.10.1"> Maspas , cunallara hachara churashcami yura sapii .
(trg)="b.MAT.3.10.2"> Chimanda maican yura mana ali muyura aparijpi cuchushca anga , ninai shitashca anga .

(src)="b.MAT.3.11.1"> तुम्ही तुमची अंत : करणे आणि जीवने वाईटाकडून चांगल्याकडे बदलली आहेत हे दर्शविण्यासाठी मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो , पण माझ्यानंतर माझ्यापेक्षाही महान असा एक येत आहे , ज्याच्या वहाणा उचलण्याची सुद्धा माझी लायकी नाही . तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील .
(trg)="b.MAT.3.11.1"> Ñuca cierto pacha cangunara bautisauni yacui , arrepentirishcamanda .
(trg)="b.MAT.3.11.2"> Astaun ñuca huashai shamuj cangunara Santo Espiritui ninais bautisangami .
(trg)="b.MAT.3.11.3"> Ñucaga mana valijchu ani paihua zapatosllas apangaj .
(trg)="b.MAT.3.11.4"> Pai ñucamanda yali ushajmi .

(src)="b.MAT.3.12.1"> तो धान्य निवडायला येईल . तो भुसा बाजूला काढील व धान्य वेगळे करील . तो चांगले धान्य कोठारात साठविल व जे चांगले नाही ते जाळून टाकील . तो भुसा कधीही न विझणाऱ्या आगीमध्ये जाळून टाकील . ”
(trg)="b.MAT.3.12.1"> Paihua maquii huairachinara chariun , llushtina pambara pichangami , trigo muyura apingami huacachina huasii , carara rupachingami mana tucurij ninai .

(src)="b.MAT.3.13.1"> तेव्हा येशू गालीलाहून यार्देन नदीकडे आला । त्याला योहानाच्या हातून बाप्तिस्मा घ्यायचा होता .
(trg)="b.MAT.3.13.1"> Shinajpi Galilea partimanda Jesús Jordanma shamuca Juanbajma , pai bautisai tucungaj .

(src)="b.MAT.3.14.1"> पण त्याला थोपवीत योहान म्हणाला , “ खरे तर मी आपल्या हातून बाप्तिस्मा घ्यायचा असे असता आपण माझ्याकडे बाप्तिस्मा घ्यायला आलात हे कसे ? ”
(trg)="b.MAT.3.14.1"> Juanga mana munacachu .
(trg)="b.MAT.3.14.2"> Canmi ñucara bautisana angui , nica .
(trg)="b.MAT.3.14.3"> ¿ Astaun canzhu ñucajma shamungui ?

(src)="b.MAT.3.15.1"> येशूने त्याला उत्तर दिले , “ आता असेच होऊ दे . देवाची इच्छा हीच आहे म्हणून आपण असेच केले पाहिजे . ” तेव्हा योहान येशूचा बाप्तिस्मा करण्यास तयार झाला .
(trg)="b.MAT.3.15.1"> Jesús paita cutipaca : Saquilla , ministirinmi ñucanchi tucui aliranara pactachingaj .
(trg)="b.MAT.3.15.2"> Shinajpi Juan lugarda cuca .

(src)="b.MAT.3.16.1"> येशूचा बाप्तिस्मा झाला आणि तो पाण्यातून वर आला , तेव्हा आकाश उघडले , आणि देवाचा आत्मा एखाद्या कबुतराप्रमाणे आपणावर उतरताना त्याला दिसला .
(trg)="b.MAT.3.16.1"> Bautisashca huasha , Jesús yacumanda sicaca , shinajpi anua pacha pascarica .
(trg)="b.MAT.3.16.2"> Diospa Espiritura palomasna irgumujta ricuca , paihua ahuai shamucami .

(src)="b.MAT.3.17.1"> त्याच वेळी आकाशातून वाणी झाली की , “ हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे , त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे . ”
(trg)="b.MAT.3.17.1"> Shu shimi anua pachamanda uyarimuca nisha : Caimi ñuca llaquishca Churi , paihuajpi yapa cushi ani .

(src)="b.MAT.4.1.1"> मग पवित्र आत्म्याने येशूला रानात नेले . मोहात पाडून सैतानाने त्याची परीक्षा घ्यावी म्हणून त्याला तेथे नेण्यात आले .
(trg)="b.MAT.4.1.1"> Shinajpi Santo Espíritu Jesusta pushaca runa illashca partima , Supai Apu paita tentangaj .

(src)="b.MAT.4.2.1"> चाळीस दिवस आणि चाळीस रात्री येशूने काहीच खाल्ले नाही . त्यानंतर त्याला खूप भूक लागली .
(trg)="b.MAT.4.2.1"> Chuscu chunga punzhara , tutandi punzhandi sasishca huasha , mana micusha , Jesús yarcachica .

(src)="b.MAT.4.3.1"> तेव्हा सैतान येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला व म्हणाला , “ जर तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा दे . ”
(trg)="b.MAT.4.3.1"> Supai paihuajma tentangaj shamusha , paita nica : Can Diospa Churi ashaga , cai rumiunara rimai : Tanda tucui , nisha .

(src)="b.MAT.4.4.1"> येशूने उत्तर दिले , “ असे लिहिले आहे की , ‘ मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर देवाच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल . ” ‘ अनुवाद 8 : 3
(trg)="b.MAT.4.4.1"> Jesús cutipasha nica : Quillcashcami tian : Mana tandallahua runa causangachu , astaun Dios tucui rimashca shimimandas .

(src)="b.MAT.4.5.1"> मग सैतानाने त्याला पवित्र नगरात ( यरुशलेेमात ) नेले . सैतानाने येशूला मंदिराच्या कंगोऱ्यावर उभे केले .
(trg)="b.MAT.4.5.1"> Shinajpi Supai Apu paita Dios ajllashca llactama pushaca , templo nishca Diospa huasi ahua pundai paita shayachica .

(src)="b.MAT.4.6.1"> आणि त्याला म्हटले , “ जर तू देवाचा पूत्र आहेस तर खाली उडी टाक , कारण असे लिहिले आहे की , ‘ देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि तुझे पाय खडकावर आपटू नयेत म्हणून ते तुला हातांवर झेलतील . ” ‘ स्तोत्र 91 : 11-12
(trg)="b.MAT.4.6.1"> Paita nica : Can Diospa Churi ashaga , allpama urmai ; casna quillcashcami tian : Paihua angelgunara cambajma cachangami .
(trg)="b.MAT.4.6.2"> Shinallara , Canda apinaungami paiguna maquiunai , ama camba chaqui nijtaringaj rumii .

(src)="b.MAT.4.7.1"> येशूने त्याला उत्तर दिले , “ असे सुद्धा लिहिले आहे की , ‘ देव जो तुझा प्रभु याची परीक्षा पाहू नको . ” ‘ अनुवाद 6 : 16
(trg)="b.MAT.4.7.1"> Jesús paita cutipaca : Shinallara quillcashcami tian : Señorda camba Diosta ama tentanguichu .

(src)="b.MAT.4.8.1"> मग सैतानाने येशूला एका खूप उंच पर्वतावर नेले . त्याने येशूला जगातील राज्ये अणि त्यांतील सर्व वैभव दाखविले .
(trg)="b.MAT.4.8.1"> Cutillara , Supai Apu paita shu yapa ahua urcuma pushaca , chimanda tucui mundu llactaunara ricuchica paiguna sumajndi .

(src)="b.MAT.4.9.1"> सैतान म्हणाला , “ जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सारे तुला देईन . ” ‘
(trg)="b.MAT.4.9.1"> Supai paita nica : Cai tucuira canda cushami can tuama urmasha ñucara adorajpi .

(src)="b.MAT.4.10.1"> तेव्हा येशू त्याला म्हणाला , “ अरे सैताना , माझ्यापासून दूर हो ! कारण असे लिहिले आहे की ‘ देव जो तुझा प्रभु त्याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर . ” ‘ अनुवाद 6 : 13
(trg)="b.MAT.4.10.1"> Shinajpi Jesús paita nica : Ri , Satanás , quillcashcami tian : Señorda camba Diosta adorana mangui , paulara sirvina mangui .

(src)="b.MAT.4.11.1"> मग सैतान येशूला सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन त्याची देखभाल करू लागले .
(trg)="b.MAT.4.11.1"> Shinajpi Supai Apu paita saquica .
(trg)="b.MAT.4.11.2"> Angelguna shamunauca , paita sirvinauca .

(src)="b.MAT.4.12.1"> नंतर योहानाला तुरूंगात टाकले आहे हे ऐकून येशू गालीलास परतला .
(trg)="b.MAT.4.12.1"> Jesús Juan chonda cularbi ishcashcara uyasha , Galileama tigraca .

(src)="b.MAT.4.13.1"> परंतू तो नासरेथ येथे राहिला नाही , तर गालील सरोवराजवळील कफर्णहूम नगरात जाऊन राहिला . जबुलून व नफताली ह्या प्रदेशांना लागुनच कफर्णहूम नगर आहे .
(trg)="b.MAT.4.13.1"> Nazaret llactara saquisha , Capernaum nishca lamar patai tiaj llactama shamuca , chihui causauca .
(trg)="b.MAT.4.13.2"> Capernaum llacta Zabulón Neftalí nishca partiunai tian .

(src)="b.MAT.4.14.1"> यशया ह्या संदेष्ट्याने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे यासाठी हे झाले . यशयाने वर्तविलेले भविष्य असे होते :
(trg)="b.MAT.4.14.1"> Jesús caima shamuca Isaías nishca Diosmanda rimaj rimashcara pactachingaj , casna nisha :

(src)="b.MAT.4.15.1"> जबुलून आणि नफताली प्रांत समुद्राकडे येणारे मार्ग , यार्देन नदीपलीकडचा प्रदेश व यहूदीतरांचा गालील यांमधील-
(trg)="b.MAT.4.15.1"> Zabulón llactas , Neftalí llactas , lamar ñambii , Jordan huashai , gentil nishcauna Galilea partii ;

(src)="b.MAT.4.16.1"> अंधारात वावरणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला . मरणाचे सावट असलेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी प्रकाश अवतरला . ” यशया 9 : 1-2
(trg)="b.MAT.4.16.1"> Llandu tutai tiarij runauna atun velara ricunauca .
(trg)="b.MAT.4.16.2"> Huañuna llandui tiarijgunara vela punzhayachicami .

(src)="b.MAT.4.17.1"> त्योवेळेपासून येशू उपदेश करू लागला व म्हणू लागला की , “ पश्चात्ताप करा , कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे . ” ( मार्क 1 : 16-20 ; लूक 5 : 1-11 )
(trg)="b.MAT.4.17.1"> Chi horasmanda pacha , Jesús yachachingaj callarica .
(trg)="b.MAT.4.17.2"> Rimai callarica : Arrepentirichi , nisha , ahua pacha mandana mayanllayashcami .

(src)="b.MAT.4.18.1"> नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना पाहिले . ते कोळी होते . ते जाळे टाकून मासे धरीत होते .
(trg)="b.MAT.4.18.1"> Jesús , Galilea lamar rayai puriusha , ishquindi uquira ricuca , Pedro nishca Simón aca , paihua uqui Andresndi , licarinauca lamarbi .
(trg)="b.MAT.4.18.2"> Aichahuara apijguna anauca .

(src)="b.MAT.4.19.1"> तो त्यांना म्हणाला , “ तुम्ही माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन . ”
(trg)="b.MAT.4.19.1"> Paigunara nica : Ñucara catihuaichi , cangunara runara licajgunara rasha .

(src)="b.MAT.4.20.1"> मग ते मागेपुढे न पाहता लगेच जाळे टाकून देऊन ते त्याच्या मागे चालू लागले .
(trg)="b.MAT.4.20.1"> Paiguna licaunara dsas saquisha , paita catinauca .

(src)="b.MAT.4.21.1"> तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर नावेत आपली जाळी नीट करताना पाहिले . आणि त्याने त्यांना बोलावले .
(trg)="b.MAT.4.21.1"> Chimanda rijpi , shu ishquindi uquira ricuca , Jacobo Zebedeo churi paihua uqui Juandi .
(trg)="b.MAT.4.21.2"> Paiguna yaya Zebedeohua canoai tianauca licaunara sirasha .
(trg)="b.MAT.4.21.3"> Jesús paigunara cayaca : Shamichi , nisha .

(src)="b.MAT.4.22.1"> तेव्हा ते आपली नाव व आपले वडील यांना सोडून त्याच्या मागे गेले .
(trg)="b.MAT.4.22.1"> Paiguna dsaslla canoara yayaras saquisha , paita catinauca .

(src)="b.MAT.4.23.1"> येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला , येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली . येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली .
(trg)="b.MAT.4.23.1"> Jesús tucui Galilea partiunama risha , paiguna tandarina huasiunai yachachisha , Dios mandana pacha ali shimira camachisha , tucui ungüigunaras tucui nanaigunaras alichisha purica .

(src)="b.MAT.4.24.1"> येशूविषयीची बातमी सर्व सूरीया देशभर पसरली ; मग जे दुखणेकरी होते , ज्यांना नाना प्रकारचे रोग व आजार होते , ज्यांना भूतबाधा झाली होती , जे फेफरेकरी व पक्षाघाती होते अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणी त्याने त्यांना बरे केले .
(trg)="b.MAT.4.24.1"> Paihua shuti uyarica tucui Siria nishca partiunai .
(trg)="b.MAT.4.24.2"> Paihuajma pushamunauca nanachijgunara , imahua ungusha tormendarishcaunaras , supai apishcaunaras , loco tucushcaunaras , suchu nishca mana purina ushajgunaras .
(trg)="b.MAT.4.24.3"> Paigunara alichica .

(src)="b.MAT.5.1.1"> येशूने तेथे पुष्कळ लोक पाहिले . म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला , मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले .
(trg)="b.MAT.5.1.1"> Jesús chi ashca runaunara ricusha , urcuma sicaca ; pai tiarijpi pai yachachishca runauna paihuajma shamunauca .

(src)="b.MAT.5.2.1"> आणि त्याने त्यांना शिकविण्यास सरुवात केली . तो म्हणाला ,
(trg)="b.MAT.5.2.1"> Jesús rimasha paigunara yachachica nisha :

(src)="b.MAT.5.3.1"> “ जे आत्म्याने दीन ते धन्य , कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे .
(trg)="b.MAT.5.3.1"> Cushiunami almai pugri anchi nijguna .
(trg)="b.MAT.5.3.2"> Paigunajmi ahua pacha mandana .

(src)="b.MAT.5.4.1"> जे शोक करतात ते धन्य , कारण त्याचे सांत्वन करण्यात येईल .
(trg)="b.MAT.5.4.1"> Cushiunami huacajguna , paiguna cushi tucunaungami .

(src)="b.MAT.5.5.1"> जे नम्र ते धन्य , कारण त्यांना वचनदत्त भूमीचे वतन मिळेल .
(trg)="b.MAT.5.5.1"> Cushiunami mansouna , paiguna cai pachara cui tucunaungami .

(src)="b.MAT.5.6.1"> ज्यांना नीतीने वागण्याची तहान व भूक लागली आहे ते धन्य , कारण ते तृप्त होतील .
(trg)="b.MAT.5.6.1"> Cushiunami alirangaj yarcachijguna upinaichijguna , sajsachisca anaunga .

(src)="b.MAT.5.7.1"> जे दयाळू ते धन्य , कारण त्यांचावर दया करण्यत येईल .
(trg)="b.MAT.5.7.1"> Cushiunami llaquij shunguyujguna , paiguna llaquishca tucunaungami .

(src)="b.MAT.5.8.1"> जे अंत : करणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील .
(trg)="b.MAT.5.8.1"> Cushiunami chuyaj shunguuna , paiguna Diosta ricunaungami .

(src)="b.MAT.5.9.1"> जे शांति करणारे ते धन्य , कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल .
(trg)="b.MAT.5.9.1"> Cushiunami macanaujpurara alichijguna , Diospa churiuna nishca anaunga .

(src)="b.MAT.5.10.1"> नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे .
(trg)="b.MAT.5.10.1"> Cushiunami aliranamanda tormendachishcauna , paigunajmi ahua pacha mandana .

(src)="b.MAT.5.11.1"> “ जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील , तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आहात .
(trg)="b.MAT.5.11.1"> Cushiunami anguichi imahoras ñucamanda chijnishca tormendachishca asha , ima manaliras cangunamanda llullasha rimanaupi .

(src)="b.MAT.5.12.1"> आनंद करा आणि उल्हास करा , कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे ; कारण जे संदेष्टे तुमच्यापूर्वी होते त्यांचा त्यांनी तसाच छळ केला . ( मार्क 9 : 50 ; लूक 14 : 34-35 )
(trg)="b.MAT.5.12.1"> Cushiyaichi , cariyaichi , cangunara pagana atunmi ahua pachai .
(trg)="b.MAT.5.12.2"> Shinallarami tormendachinauca cangunamanda ñaupa tiaj Diosmanda rimajgunara .