# kab/Kabyle-NT.xml.gz
# mr/Marathi.xml.gz


(src)="b.MAT.1.1.1"> A ten-an izuṛan n Ɛisa Lmasiḥ yellan si dderya n Sidna Dawed akk-d Sidna Ibṛahim :
(trg)="b.MAT.1.1.1"> येशु ख्रिस्ताचा कुलवृत्तांत येणेप्रमाणे : तो दाविदाच्या कुळात जन्मला . दावीद अब्राहामाच्या कुळातील होता .

(src)="b.MAT.1.2.1"> Sidna Ibṛahim yeǧǧa-d Isḥaq , Isḥaq yeǧǧa-d Yeɛqub , Yeɛqub yeǧǧa-d Yahuda d watmaten-is .
(trg)="b.MAT.1.2.1"> अब्राहाम इसहाकचा पिता होता . इसहाक याकोबाचा पिता होता . याकोब याहूदा व त्याच्या भावांचा पिता होता .

(src)="b.MAT.1.3.1"> Yahuda akk-d Tamaṛ ǧǧan-d Fares , akk-d Ziraḥ ; Fares yeǧǧa-d Ḥesrun , Ḥesrun yeǧǧa-d Aram .
(trg)="b.MAT.1.3.1"> यहूदा पेरेस व जेरहाचा पिता होता . ( त्यांची आई तामार होती . ) पेरेस हेस्रोनाचा पिता होता . हेस्रोन रामाचा पिता होता .

(src)="b.MAT.1.4.1"> Aram yeǧǧa-d Ɛaminadab , Ɛaminadab yeǧǧa-d Naḥsun , Naḥsun yeǧǧa-d Salmun .
(trg)="b.MAT.1.4.1"> रामा अम्मीनादाबाचा पिता होता . अम्मीनादाब नहशोनाचा पिता होता . नहशोन सल्मोनाचा पिता होता .

(src)="b.MAT.1.5.1"> Salmun d Raḥab ǧǧan-d Buɛaz , Buɛaz akk-d Rut sɛan-d Ɛubed , Ɛubed yeǧǧa-d Yassa .
(trg)="b.MAT.1.5.1"> सल्मोन बवाजाचा पिता होता . ( बवाजाची आई राहाब होती . ) बवाज ओबेदचा पिता होता . ( ओबेदची आई रूथ होती ) ओबेद इशायचा पिता होता .

(src)="b.MAT.1.6.1"> Yassa yeǧǧa-d Sidna Dawed , Sidna Dawed yuɣal d agellid , yeǧǧa-d ɣer tmeṭṭut n Uryaḥ Sidna Sliman .
(trg)="b.MAT.1.6.1"> इशाय दावीद राजाचा पिता होता . दावीद शलमोनाचा पिता होता . ( शलमोनाची आई पूर्वी उरीयाची पत्नी होती . )

(src)="b.MAT.1.7.1"> Sidna Sliman yeǧǧa-d Raḥabɛam , Raḥabɛam yeǧǧa-d Abiya , Abiya yeǧǧa-d Asaf ,
(trg)="b.MAT.1.7.1"> शलमोन रहबामचा पिता होता . रहबाम अबीयाचा पिता होता . अबीया आसाचा पिता होता .

(src)="b.MAT.1.8.1"> Asaf yeǧǧa-d Yehucafat ; Yehucafat yeǧǧa-d Yihuram ; Yihuram yeǧǧa-d Ɛuzya ;
(trg)="b.MAT.1.8.1"> आसा यहोशाफाटाचा पिता होता . यहोशाफाट योरामाचा पिता होता . योराम उज्जीयाचा पिता होता .

(src)="b.MAT.1.9.1"> Ɛuzya yeǧǧa-d Yuṭam ; Yuṭam yeǧǧa-d Aḥaz ; Aḥaz yeǧǧa-d Ḥizeqya ;
(trg)="b.MAT.1.9.1"> उज्जीया योथामचा पिता होता . योथाम आहाजचा पिता होता . आहाज हिज्कीयाचा पिता होता .

(src)="b.MAT.1.10.1"> Ḥizeqya yeǧǧa-d Mennac ; Mennac yeǧǧa-d Ɛamun ; Ɛamun yeǧǧa-d Yuciya ;
(trg)="b.MAT.1.10.1"> हिज्कीया मनश्शेचा पिता होता . मनश्शे आमोनचा पिता होता . आमोन योशीयाचा पिता होता .

(src)="b.MAT.1.11.1"> Yuciya yeǧǧa-d Yixunya akk-d watmaten-is , di lweqt i deg iqaldiyen wwin at Isṛail d imeḥbas ɣer tmurt n Babilun .
(trg)="b.MAT.1.11.1"> योशीया यखन्या व त्याचे भाऊ यांचा पिता होता . ( जेव्हा यहूदी लोकांना गुलाम म्हणून बाबेलास नेण्यात आले तेव्हा हे झाले . )

(src)="b.MAT.1.12.1"> Mbeɛd lweqt n usgiǧǧi ɣer tmurtn Babilun , Yixunya yeǧǧa-d Calatyel ; Calatyel yeǧǧa-d Zurubabil .
(trg)="b.MAT.1.12.1"> त्यांना बाबेलला नेण्यात आल्यानंतरचा कुलवृत्तांत येणेप्रमाणे : यखन्या शल्तीएलचा पिता होता . शल्तीएल जरूब्बाबेलचा पिता होता .

(src)="b.MAT.1.13.1"> Zurubabil yeǧǧa-d Abihud .
(src)="b.MAT.1.13.2"> Abihud yeǧǧa-d Ilyaqim ; Ilyaqim yeǧǧa-d Ɛazuṛ ;
(trg)="b.MAT.1.13.1"> जरूब्बाबेल अबीहूदचा पिता होता . अबीहूद एल्याकीमचा पिता होता . एल्याकीम अज्जुराचा पिता होता .

(src)="b.MAT.1.14.1"> Ɛazuṛ yeǧǧa-d Saduq ; Saduq yeǧǧa-d Yaxin ; Yaxin yeǧǧa-d Ilihud .
(trg)="b.MAT.1.14.1"> अज्जुर सादोकचा पिता होता . सादोक याखीमचा पिता होता . याखीम एलीहूदचा पिता होता .

(src)="b.MAT.1.15.1"> Ilhud yeǧǧa-d Ilɛazaṛ ; Ilɛazaṛ yeǧǧa-d Mattan ; Mattan yeǧǧa-d Yeɛqub .
(trg)="b.MAT.1.15.1"> एलीहूद एलाजारचा पिता होता . एलाजारचा मत्तानचा पिता होता . मत्तान याकोबाचा पिता होता .

(src)="b.MAT.1.16.1"> Yeɛqub yeǧǧa-d Yusef , d Yusef agi i d argaz n Meryem i d-yeǧǧan Sidna Ɛisa i gețțusemman Lmasiḥ .
(trg)="b.MAT.1.16.1"> याकोब योसेफाचा पिता होता . योसेफ मरीयेचा पती होता . मरीया येशूची आई होती . येशूला ‘ ख्रिस्त ’ म्हटले आहे .

(src)="b.MAT.1.17.1"> Si lweqt n Sidna Ibṛahim armi d lweqt n Sidna Dawed , ɛeddan ṛbeɛṭac n leǧyal .
(src)="b.MAT.1.17.2"> Ɛeddan daɣen ṛbeɛṭac n leǧyal si lweqt n Sidna Dawed armi d lweqt n usgiǧǧi ɣer tmurt n Babilun .
(src)="b.MAT.1.17.3"> Si lweqt-agi n usgiǧǧi armi d lweqt n Lmasiḥ ɛeddan daɣen ṛbeɛṭac n leǧyal .
(trg)="b.MAT.1.17.1"> याप्रमाणे अब्राहामापासून दाविदापर्यत चौदा पिढ्या झाल्या आणि दाविदापासून बाबेलच्या बंदीवासापर्यंत चौदा पिढ्या झाल्या . बाबेलच्या बंदिवासापासून ख्रिस्ताच्या जन्मापर्यत चौदा पिढ्या झाल्या . ( लूका2.1-7 )

(src)="b.MAT.1.18.1"> Atan wamek i d-ilul Sidna Ɛisa : yemma-s Meryem tella tețwaxḍeb i yiwen wergaz ițțusemman Yusef .
(src)="b.MAT.1.18.2"> S tezmert n Ṛṛuḥ iqedsen , terfed s tadist uqbel aț-țeddu ț-țislit .
(trg)="b.MAT.1.18.1"> येशू ख्रिस्ताच्या आईचे नाव मरीया होते आणि येशू ख्रिस्ताचा जन्म अशाप्रकारे झाला . मरीयेचे योसेफशी लग्न ठरले होते . परंतु त्या अगोदरच ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती आहे असे दिसून आले .

(src)="b.MAT.1.19.1"> Yusef axḍib-is , yellan d argaz n ṣṣwab , ur yebɣi ara a ț-țicemmet , dɣa yeqsed ad imsefṛaq yid-es s tuffra .
(trg)="b.MAT.1.19.1"> तिचा भावी पती योसेफ चांगला मनुष्य होता . तिची लोकांमध्ये बदनामी होऊ नये म्हणून त्याने गुपचूप तिला सूटपत्र देण्याचा विचार केला .

(src)="b.MAT.1.20.1"> Akken yețxemmim i waya , yers-ed ɣuṛ-es lmelk n Ṛebbi di targit yenna-yas : A Yusef !
(src)="b.MAT.1.20.2"> A mmi-s n Dawed !
(src)="b.MAT.1.20.3"> Ur țțaggad ara aț-țesɛuḍ Meryem ț-țameṭṭut-ik , axaṭer llufan yellan di tɛebbuṭ-is , yusa-yas-d s Ṛṛuḥ iqedsen .
(trg)="b.MAT.1.20.1"> पण असे विचार त्याच्या मनात घोळत असतानाच देवाच्या दूताने स्वप्नात त्याला दर्शन दिले आणि सांगितले , “ दाविदाच्या वंशातील योसेफा , मरीयेशी लग्न करण्यास अनमान करू नकोस कारण तिला होणारे मूल पवित्र आत्म्यापासून होणार आहे .

(src)="b.MAT.1.21.1"> A d-tesɛu aqcic , a s-tsemmiḍ Ɛisa , axaṭer d nețța ara iselken lumma-s si ddnubat-nsen .
(trg)="b.MAT.1.21.1"> त्याचे नाव तू येशू4 ठेव . कारण तो त्याच्या लोकांची पापापासून सुटका करील . ”

(src)="b.MAT.1.22.1"> Ayagi akk yedṛa iwakken ad ițwakemmel wayen i d-yenna Sidi Ṛebbi seg imi n nnbi Iceɛya :
(trg)="b.MAT.1.22.1"> हे सर्व यासाठी घडले की , प्रभुने संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते , त्याची पूर्तता व्हावी .

(src)="b.MAT.1.23.1"> Ațan tɛezrit aț-țerfed tadist , a d-tesɛu aqcic ad ițțusemmi Imanuwil yeɛni : « Ṛebbi yid-nneɣ . »
(trg)="b.MAT.1.23.1"> “ कुमारी गर्भवती होईल , ती एका मुलाला जन्म देईल आणि ते त्याला ‘ इम्मानुएल ’ म्हणजे ‘ आमच्याबरोबर देव आहे ’ असे म्हणतील . ”

(src)="b.MAT.1.24.1"> Mi i d-yuki Yusef , ixdem ayen i s-d-yenna lmelk n Sidi Ṛebbi , yeqbel Meryem aț-țili ț-țameṭṭut-is ; yewwi-ț-id ɣer wexxam-is .
(trg)="b.MAT.1.24.1"> जेव्हा योसेफ जागा झाला तेव्हा देवदूताने जशी त्याला आज्ञा केली होती तसेच त्याने केले , त्याने मरीयेशी लग्र केले .
(trg)="b.MAT.1.24.2"> 25पण तिने मुलाला जन्म देईपर्यत त्याने तिला जाणले नाही . आणि योसेफने त्याचे नाव येशू ठेवले .

(src)="b.MAT.2.1.1"> Sidna Ɛisa ilul di taddart n Bitelḥem , di tmurt n Yahuda di lweqt n ugellid Hiṛudus ameqqran , kra n imusnawen usan-d si cceṛq ɣer temdint n Lquds , iwakken ad steqsin :
(trg)="b.MAT.2.1.1"> यहूदीयातील बेथलहेम गावात येशूचा जन्म झाला . त्यावेळी हेरोद राजा राज्य करीत होता . येशूच्या जन्मानंतर पूर्वेकडून काही ज्ञानी लोक यरूशलेमाला आले .

(src)="b.MAT.2.2.1"> anda ilul llufan-nni ara yilin d agellid n wat Isṛail ?
(src)="b.MAT.2.2.2"> Axaṭer nwala-d itri-ines si cceṛq , nusa-d a t-neɛbed .
(trg)="b.MAT.2.2.1"> आणि त्यांनी विचारले , “ यहूद्यांचा नुकताच जन्मलेला राजा कोठे आहे ? कारण त्याचा जन्म सूचित करणारा तारा आम्ही पूर्व दिशेस पाहिला म्हाणून त्याला नमन करण्यास आलो आहोत . ”

(src)="b.MAT.2.3.1"> Agellid Hiṛudus akk-d imezdaɣ n temdint n Lquds meṛṛa dehcen , yerwi lxaṭer-nsen mi slan s lexbaṛ-agi .
(trg)="b.MAT.2.3.1"> हे ऐकून हेरोद राजा तसेच यरुशलेम नगराचे रहिवासी घाबरुन गेले .

(src)="b.MAT.2.4.1"> Hiṛudus yesnejmaɛ-ed akk lmuqedmin d lɛulama n wegdud , isteqsa-ten ɣef wemkan anda ara d-ilal Lmasiḥ ara d-yasen .
(trg)="b.MAT.2.4.1"> मग त्याने यहूदी लोकांचे सर्व मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांना बोलाविले आणि विचारले की , “ ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार होता ? ”

(src)="b.MAT.2.5.1"> Nnan-as : Ahat di tmurt n Yahuda di taddart n Bitelḥem !
(src)="b.MAT.2.5.2"> Axaṭer atan wayen i gura nnbi Mixa :
(trg)="b.MAT.2.5.1"> त्यांनी उत्तर दिले , “ यहूदीयातील बेथलेहेम गावात . कारण देवाच्या संदेष्टयांनी त्याविषयी असे लिहिले आहे की :

(src)="b.MAT.2.6.1"> I kemm a taddart n Bitelḥem , ur telliḍ ara ț-țaneggarut ger temdinin n Yahuda , axaṭer seg-em ara d-iffeɣ ugellid ara yeksen at Isṛail agdud-iw .
(trg)="b.MAT.2.6.1"> “ हे बेथलहेमा , यहूद्यांच्या भूमिप्रदेशा , तू यहूद्यांच्या राज्यकर्त्यामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील , असा राज्यकर्ता तुझ्यातून येईल . ” ‘ मीखा 5 : 2

(src)="b.MAT.2.7.1"> Hiṛudus yessawel i imusnawen nni s tuffra , isteqsa-ten si melmi i walan itri-nni .
(trg)="b.MAT.2.7.1"> मग हेरोदाने पूर्वेकडील ज्ञानी लोकांची गुप्तपणे भेट घेतली आणि तारा दिसल्याची नक्की वेळ माहीत करून घेतली .

(src)="b.MAT.2.8.1"> Dɣa iceggeɛ-iten ɣer Bitelḥem , yenna-yasen : Nadit lexbaṛ n ṣṣeḥ ɣef weqcic-agi , m ' ara t-tafem , init-iyi-d iwakken ad ṛuḥeɣ ula d nekk a t-ɛabdeɣ .
(trg)="b.MAT.2.8.1"> नंतर त्याने त्यांना बेथलहेमला पाठविले . हेरोद त्यांना म्हणाला , “ तुम्ही जाऊन त्या बालकाचा नीट शोध करा . आणि तुम्हांला ते सापडल्यावर मला सांगायला या . म्हणजे मी सुद्धा जाऊन त्याला नमन करू शकेन . ”

(src)="b.MAT.2.9.1"> Mi slan i ugellid , ṛuḥen .
(src)="b.MAT.2.9.2"> AAkken kan i ffɣen , walan itri-nni i ẓran di cceṛq yezwar , iteddu zdat-sen .
(src)="b.MAT.2.9.3"> MMi gewweḍ sennig wemkan anda yella weqcic-nni , yeḥbes .
(trg)="b.MAT.2.9.1"> ज्ञानी लोकांनी राजाचे म्हणणे ऐकले व ते निघाले , त्यांनी जो तारा पूर्वेला होता तोच त्यांना परत दिसला . ज्ञानी लोक त्या ताऱ्याच्या मागे गेले . जेथे बाळ होते ते ठिकाण येईपर्यंत तारा त्यांच्यासमोर जात होता . मग त्या ठिकाणावर तो थांबला .

(src)="b.MAT.2.10.1"> Feṛḥen aṭas mi walan itri-nni .
(trg)="b.MAT.2.10.1"> ज्ञानी लोकांना ते पाहून फार आनंद झाला .

(src)="b.MAT.2.11.1"> Kecmen ɣer wexxam-nni , walan llufan akk-d yemma-s Meryem ; tɛeǧben s weqcic-nni dɣa seǧǧden zdat-es .
(src)="b.MAT.2.11.2"> FFsin tiyemmusin-nsen , fkan-as tirezfin : ddheb , lebxuṛ akk-d leɛṭeṛ ɣlayen .
(trg)="b.MAT.2.11.1"> ज्ञानी लोक बाळ होते त्या गोठ्यात आले . त्यांनी बाळ व त्याची आई मरीया हिला पाहिले . त्यांनी लवून त्या बालकाला नमन केले . नंतर त्यांनी बाळासाठी आणालेल्या भेटवस्तु काढल्या . त्यांनी बाळाला सोने , ऊद व गंधरस ह्या बहुमोल वस्तु दिल्या .

(src)="b.MAT.2.12.1"> Sidi Ṛebbi ixebbeṛ-iten-id di targit ur țțuɣalen ara ɣer Hiṛudus , dɣa uɣalen ɣer tmurt-nsen seg ubrid nniḍen .
(trg)="b.MAT.2.12.1"> पण देवाने स्वप्नाद्वारे त्या ज्ञानी लोकांना सावध केले आणि हेरोदाकडे परत जाऊ नका असे सांगिले . तेव्हा ते ज्ञानी लोक वेगव्व्या मार्गाने आपल्या देशास परतले .

(src)="b.MAT.2.13.1"> Mi ṛuḥen , lmelk n Sidi Ṛebbi idheṛ-as-ed i Yusef di targit , yenna-yas-ed : -- Kker , ddem aqcic akk-d yemma-s , rewlet ɣer tmurt n Maṣeṛ , qqimet dinna alamma nniɣ-ak-ed a d-tuɣaleḍ , axaṭer Hiṛudus ad iqelleb ɣef weqcic-agi iwakken a t-ineɣ .
(trg)="b.MAT.2.13.1"> ज्ञानी लोक गेल्यानंतर , प्रभूचा दूत स्वप्नात येऊन योसेफाला म्हणाला , “ ऊठ ! बालकाला आणि त्याच्या आईला घेऊन निसटून इजिप्त देशास जा . कारण बाळाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध घेणार आहे , तेव्हा मी तुला धोका टळल्याची सूचना देईपर्यंत इजिप्तमध्येच राहा . ”

(src)="b.MAT.2.14.1"> Yusef ikker yewwi aqcic-nni akk-d yemma-s deg iḍ , yerwel ɣer tmurt n Maṣeṛ .
(trg)="b.MAT.2.14.1"> तेव्हा तो उठाला व रात्रीच बाळाला व त्याच्या आईला घेऊन इजिप्त देशास गेला .

(src)="b.MAT.2.15.1"> Yeqqim dinna armi yemmut Hiṛudus , iwakken ad idṛu wayen i d-yenna Sidi Ṛebbi seg imi n nnbi Huceɛ : Ssawleɣ-as i Mmi a d-iffeɣ si tmurt n Maṣer .
(trg)="b.MAT.2.15.1"> आणि हेरोद मरेपर्यंत तेथेच राहिला . प्रभु देवाने संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते की , ‘ मी माझ्या मुलाला इजिप्त देशातून बोलाविले आहे ’ ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले .

(src)="b.MAT.2.16.1"> Mi gwala Hiṛudus belli kelxen-t imusnawen-nni , ikcem-it zzɛaf d ameqqran , iceggeɛ ɣer taddart n Bitelḥem akk-d ț-țmura i s-d-izzin , ad nɣen arrac meṛṛa yesɛan si sin iseggasen d akessar , s wakken yella leḥsab i s-d-fkan imusnawen-nni .
(trg)="b.MAT.2.16.1"> तेव्हा ज्ञानी लोकांनी आपल्याला फसविले , हे पाहून हेरोद अतिशय रागावाला . त्याने ज्ञानी लोकांकडून त्या बालकाच्या जन्माची वेळ नीट समजून घेतली होती . त्यानुसार बालक जन्मल्याला आता दोन वर्षे उलटली होती . म्हणून त्याने माणसे पाठवून बेथलहेम व त्याच्या आसपासच्या प्रदेशातील दोन वर्षाच्या व त्याहून कमी वयाच्या मुलांची कत्तल करण्याची आज्ञा केली .

(src)="b.MAT.2.17.1"> Dɣa yețwakemmel wayen i d yenna nnbi Irmiya :
(trg)="b.MAT.2.17.1"> यिर्मया संदेष्ट्यांच्या द्वारे देवाने जे सांगितले होते ते अशा प्रकारे पूर्ण झाले . ते वचन असे होते :

(src)="b.MAT.2.18.1"> Yekker leɛyaḍ di taddart n Rama , nesla i imeṭṭawen d umeǧǧed , d Ṛaḥil i gețrun ɣef warraw-is , tegguma aț-țesbeṛ fell-asen , axaṭer mmuten .
(trg)="b.MAT.2.18.1"> रामा येथे आकांत ऐकू आला . दु : खदायक रडण्याचा हा आकांत होता . राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे , पण तिचे सांत्वन करणे अशक्य झाले कारण तिची मुले मरण पावली आहेत . ” यिर्मया 31 : 15

(src)="b.MAT.2.19.1"> Mi gemmut Hiṛudus ameqqran , lmelk n Sidi Ṛebbi iweḥḥa-d i Yusef di targit mi gella di tmurt n Maṣer ,
(trg)="b.MAT.2.19.1"> हेरोद मेल्यांनंतर प्रभुचा दूत स्वप्नात योसेफाकडे आला . योसेफ जेव्हा इजिप्तमध्ये होता तेव्हा हे घडले .

(src)="b.MAT.2.20.1"> yenna-yas : Kker , ddem aqcic d yemma-s tuɣaleḍ ɣer tmurt n wat Isṛail , axaṭer wid yebɣan ad nɣen aqcic-nni , mmuten .
(trg)="b.MAT.2.20.1"> दूत म्हणाला “ ऊठ ! बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास जा . जे लोक बाळाला मारू पाहत होते ते आता मेले आहेत . ”

(src)="b.MAT.2.21.1"> Yusef iddem aqcic-nni d yemma-s , yuɣal ɣer tmurt n wat Isṛail
(trg)="b.MAT.2.21.1"> मग योसेफ बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास गेला .

(src)="b.MAT.2.22.1"> Meɛna mi gesla belli d Aṛxilyus mmi-s n Hiṛudus , i gellan d agellid ɣef tmurt n Yahuda , yuggad .
(src)="b.MAT.2.22.2"> SSidi Ṛebbi iɛeggen-as-ed di targit , iṛuḥ ɣer tmurt n Jlili ,
(trg)="b.MAT.2.22.1"> हेरोदाच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा अर्खेलाव यहूदाचा राजा झाला आहे असे जेव्हा योसेफाला समजले , तेव्हा तो तेथे जाण्यास घाबरला . पण स्वप्नात त्याला ताकीद मिळाल्याने तो तेथून निघाला आणि गालील प्रदेशात आला .

(src)="b.MAT.2.23.1"> izdeɣ deg yiwet n taddart ițțusemman Naṣaret , iwakken ad yedṛu wayen i d-nnan lenbiya : Ad ițțusemmi Anaṣari .
(trg)="b.MAT.2.23.1"> योसेफ नासरेथ नावाच्या गावात गेला आणि तेथे राहिला . ख्रिस्त नासरेथकर म्हटला जाईल , असे जे देवाने संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणूल हे झाले .

(src)="b.MAT.3.1.1"> Deg wussan-nni , iban-ed Yeḥya aɣeṭṭas , yețbecciṛ deg unezṛuf n tmurt n Yahuda ,
(trg)="b.MAT.3.1.1"> त्या दिवसांत बाप्तिस्मा करणारा योहान आला आणि यहूदीयाच्या वैराण प्रदेशात उपदेश करू लागला ; तो म्हणाला ,

(src)="b.MAT.3.2.1"> iqqaṛ-ed : Tubet , beddlet tikli , axaṭer tagelda n igenwan tqeṛṛeb-ed .
(trg)="b.MAT.3.2.1"> “ तुमची अंत : करणे व जीवने वाईटपणाकडून चांगुलपणामध्ये बदला कारण स्वर्गाचे राज्य जवळ येत आह्रे ”

(src)="b.MAT.3.3.1"> Fell-as i d-immeslay nnbi Iceɛya mi d-yenna : Ț-țaɣect n win ițɛeggiḍen di lxali : Heggit abrid n Sidi Ṛebbi , ssemsawit iberdan-is .
(trg)="b.MAT.3.3.1"> यशया हा संदेष्टा ज्याच्याविषयी बोलत होता तो हाच बाप्तिस्मा करणारा योहान . त्याविषयीचे यशयाचे भविष्य असे होते : “ वैराण प्रदेशात एक मनुष्य ओरडून सांगत आहे ; ‘ प्रभु देवासाठी मार्ग तयार करा , त्याच्या वाटा सरळ करा . ” ‘ यशया 40 : 3

(src)="b.MAT.3.4.1"> Yeḥya yelsa llebsa yețwaxedmen s ccɛeṛ n welɣem , tabagust n weglim ɣef wammas-is , tamɛict-is d ibẓaẓ akk-d tament n lexla .
(trg)="b.MAT.3.4.1"> योहानाचे कपडे उंटाच्या केसांपासून बनविलेले होते . कातड्याचा कमरपट्टा त्याच्या कमरे भोवती होता . अन्न म्हणून योहान टोळ आणि रानमध खात असे .

(src)="b.MAT.3.5.1"> Imezdaɣ meṛṛa n temdint n Lquds , tamurt n Yahuda akk-d tmura i d-yezzin i wasif n Urdun , țțasen-d ɣuṛ-es
(trg)="b.MAT.3.5.1"> लोक योहानाचा उपदेश ऐकण्यास जात होते . यरूशलेम , सर्व यहूदीया प्रांत आणि यार्देन नदीच्या भोवतालच्या प्रदेशातून लोक येत होते .

(src)="b.MAT.3.6.1"> iwakken a d-qiṛṛen s ddnubat nsen , nețța yesseɣḍas-iten deg wasif nni n Urdun .
(trg)="b.MAT.3.6.1"> आपण केलेली पापे लोक त्याला सांगत होते आणि योहान त्यांना यार्देन नदीत बाप्तिस्मा देत होता .

(src)="b.MAT.3.7.1"> Mi gwala aṭas n at ifariziyen d isaduqiyen i d-ițasen ad țwaɣeḍsen , yenna-yasen : A ccetla n izerman , anwa i kkun isfaqen belli tzemrem aț-țrewlem i lḥisab i d-iteddun ?
(trg)="b.MAT.3.7.1"> योहान जेथे लोकांना बाप्तिस्मा देत होता तेथे अनेक परूशी आणि सदूकी आले . जेव्हा योहानाने त्यांना पाहिले तेव्हा तो त्यांना म्हणाला , “ अहो , सापाच्या पिल्लांनो , देवाचा जो राग ओढवणार आहे त्याच्यापासून दूर पळण्याचे तुम्हांला कोणी सुचविले ?

(src)="b.MAT.3.8.1"> Sbeggnet-ed s lecɣal-nwen belli tettubem , tbeddlem tikli .
(trg)="b.MAT.3.8.1"> म्हणून पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या .

(src)="b.MAT.3.9.1"> Ur qqaṛet ara i yiman-nwen : « Sidna Ibṛahim d jeddi-tneɣ » !
(src)="b.MAT.3.9.2"> Axaṭer , a wen-iniɣ : SSidi Ṛebbi yezmer a d-yefk dderya i Ibṛahim seg idɣaɣen-agi .
(trg)="b.MAT.3.9.1"> अणि ‘ अब्राहाम माझा पिता आहे . ’ अशी फुशारकी तुम्हांला मारता येईल असे समजू नका ; मी तुम्हांस सांगतो की , देव अब्राहामासाठी या दगडापासून मुले निर्माण करू शकतो .

(src)="b.MAT.3.10.1"> Ațan ihi tcaquṛt thegga ɣer izuṛan n ttjuṛ , yal ttejṛa ur d-nețțak ara lfakya lɛali , aț-țețwagzem , aț-țețwaḍeggeṛ ɣer tmes .
(trg)="b.MAT.3.10.1"> झाडे तोडण्यासाठी कुऱ्हाड तयार आहे . चांगले फळ न देणारे प्रत्येक झाड कापून अग्नीत टाकले जाईल .

(src)="b.MAT.3.11.1"> Nekk sseɣḍaseɣ-kkun deg waman iwakken aț-țetubem , lameɛna a d-yas yiwen yesɛan tazmert akteṛ-iw , ur uklaleɣ ara a s-fsiɣ ula d arkasen is .
(src)="b.MAT.3.11.2"> Nețța a kkun-yesseɣḍes s Ṛṛuḥ iqedsen ț-țmes .
(trg)="b.MAT.3.11.1"> तुम्ही तुमची अंत : करणे आणि जीवने वाईटाकडून चांगल्याकडे बदलली आहेत हे दर्शविण्यासाठी मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो , पण माझ्यानंतर माझ्यापेक्षाही महान असा एक येत आहे , ज्याच्या वहाणा उचलण्याची सुद्धा माझी लायकी नाही . तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील .

(src)="b.MAT.3.12.1"> Tazzert deg ufus-is , ad yebrez annar-is , ad ijmeɛ irden-is ɣer ikuffan , ma d alim a t-yesseṛɣ di tmes ur nxețți .
(trg)="b.MAT.3.12.1"> तो धान्य निवडायला येईल . तो भुसा बाजूला काढील व धान्य वेगळे करील . तो चांगले धान्य कोठारात साठविल व जे चांगले नाही ते जाळून टाकील . तो भुसा कधीही न विझणाऱ्या आगीमध्ये जाळून टाकील . ”

(src)="b.MAT.3.13.1"> Sidna Ɛisa yusa-d si tmurt n Jlili ɣer wasif n Urdun iwakken a t- yesseɣḍes Yeḥya .
(trg)="b.MAT.3.13.1"> तेव्हा येशू गालीलाहून यार्देन नदीकडे आला । त्याला योहानाच्या हातून बाप्तिस्मा घ्यायचा होता .

(src)="b.MAT.3.14.1"> Yeḥya yugi , yenna-yas : D nekk i geḥwaǧen ad iyi- tesɣeḍseḍ , kečč tusiḍ-ed ɣuṛ-i iwakken a k-sɣeḍseɣ !
(trg)="b.MAT.3.14.1"> पण त्याला थोपवीत योहान म्हणाला , “ खरे तर मी आपल्या हातून बाप्तिस्मा घ्यायचा असे असता आपण माझ्याकडे बाप्तिस्मा घ्यायला आलात हे कसे ? ”

(src)="b.MAT.3.15.1"> Sidna Ɛisa yerra-yas : Anef tura !
(src)="b.MAT.3.15.2"> Akkagi i glaq a nexdem lebɣi n Sidi Ṛebbi !
(src)="b.MAT.3.15.3"> DDɣa Yeḥya yunef-as .
(trg)="b.MAT.3.15.1"> येशूने त्याला उत्तर दिले , “ आता असेच होऊ दे . देवाची इच्छा हीच आहे म्हणून आपण असेच केले पाहिजे . ” तेव्हा योहान येशूचा बाप्तिस्मा करण्यास तयार झाला .

(src)="b.MAT.3.16.1"> Mi gețwaɣḍes Sidna Ɛisa , yeffeɣ-ed seg waman ; imiren kan ldin igenwan , yers-ed fell-as Ṛṛuḥ n Sidi Ṛebbi s ṣṣifa n tetbirt .
(trg)="b.MAT.3.16.1"> येशूचा बाप्तिस्मा झाला आणि तो पाण्यातून वर आला , तेव्हा आकाश उघडले , आणि देवाचा आत्मा एखाद्या कबुतराप्रमाणे आपणावर उतरताना त्याला दिसला .

(src)="b.MAT.3.17.1"> Tekka-d yiwet n taɣect seg igenwan , tenna-d : «` Wagi d Mmi ameɛzuz, deg-s i gella lfeṛḥ-iw ! »
(trg)="b.MAT.3.17.1"> त्याच वेळी आकाशातून वाणी झाली की , “ हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे , त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे . ”

(src)="b.MAT.4.1.1"> Imiren Ṛṛuḥ iqedsen yewwi Sidna Ɛisa ɣer unezṛuf iwakken a t-ijeṛṛeb Cciṭan .
(trg)="b.MAT.4.1.1"> मग पवित्र आत्म्याने येशूला रानात नेले . मोहात पाडून सैतानाने त्याची परीक्षा घ्यावी म्हणून त्याला तेथे नेण्यात आले .

(src)="b.MAT.4.2.1"> Mi guẓam ṛebɛin wussan d ṛebɛin wuḍan , yuɣal yelluẓ .
(trg)="b.MAT.4.2.1"> चाळीस दिवस आणि चाळीस रात्री येशूने काहीच खाल्ले नाही . त्यानंतर त्याला खूप भूक लागली .

(src)="b.MAT.4.3.1"> Iqeṛṛeb ɣuṛ-es Yeblis yenna-yas : Ma d Mmi-s n Ṛebbi i telliḍ , ini-yasen i yedɣaɣen-agi ad uɣalen d aɣṛum .
(trg)="b.MAT.4.3.1"> तेव्हा सैतान येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला व म्हणाला , “ जर तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा दे . ”

(src)="b.MAT.4.4.1"> Sidna Ɛisa yerra-yas : Yura di tira iqedsen : Mačči s weɣṛum kan ara iɛic wemdan , lameɛna s mkul awal i d-ițasen s ɣuṛ Sidi Ṛebbi .
(trg)="b.MAT.4.4.1"> येशूने उत्तर दिले , “ असे लिहिले आहे की , ‘ मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर देवाच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल . ” ‘ अनुवाद 8 : 3

(src)="b.MAT.4.5.1"> Cciṭan yewwi-t ɣer temdint n Lquds issers-it ɣef yixef n lǧameɛ iqedsen ,
(trg)="b.MAT.4.5.1"> मग सैतानाने त्याला पवित्र नगरात ( यरुशलेेमात ) नेले . सैतानाने येशूला मंदिराच्या कंगोऱ्यावर उभे केले .

(src)="b.MAT.4.6.1"> yenna-yas : Ma d Mmi-s n Ṛebbi i telliḍ , ḍeggeṛ iman-ik d akessar , anaɣ yura : Sidi Ṛebbi ad yefk lameṛ i lmalayekkat-is fell-ak , aa k-awint ger ifassen-nsent iwakken ad ḥadrent aḍar-ik ɣef yedɣaɣe n .
(trg)="b.MAT.4.6.1"> आणि त्याला म्हटले , “ जर तू देवाचा पूत्र आहेस तर खाली उडी टाक , कारण असे लिहिले आहे की , ‘ देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि तुझे पाय खडकावर आपटू नयेत म्हणून ते तुला हातांवर झेलतील . ” ‘ स्तोत्र 91 : 11-12

(src)="b.MAT.4.7.1"> Sidna Ɛisa yerra-yas : Yura daɣen : Ur tețjeṛṛibeḍ ara Sidi Ṛebbi IIllu-inek .
(trg)="b.MAT.4.7.1"> येशूने त्याला उत्तर दिले , “ असे सुद्धा लिहिले आहे की , ‘ देव जो तुझा प्रभु याची परीक्षा पाहू नको . ” ‘ अनुवाद 6 : 16

(src)="b.MAT.4.8.1"> Cciṭan yewwi-t daɣen ɣef wedrar ɛlayen , isken-as-ed tigeldiwin meṛṛa n ddunit d lɛaḍima-nsent , yenna-yas :
(trg)="b.MAT.4.8.1"> मग सैतानाने येशूला एका खूप उंच पर्वतावर नेले . त्याने येशूला जगातील राज्ये अणि त्यांतील सर्व वैभव दाखविले .

(src)="b.MAT.4.9.1"> A k-tent-fkeɣ meṛṛa ma yella tseǧǧdeḍ zdat-i a yi-tɛebdeḍ .
(trg)="b.MAT.4.9.1"> सैतान म्हणाला , “ जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सारे तुला देईन . ” ‘

(src)="b.MAT.4.10.1"> Sidna Ɛisa yenna-yas : Beɛɛed akkin fell-i a Cciṭan , axaṭer yura : Anagar Sidi Ṛebbi-inek ara tɛebdeḍ , i nețța kan iwumi ara tseǧdeḍ .
(trg)="b.MAT.4.10.1"> तेव्हा येशू त्याला म्हणाला , “ अरे सैताना , माझ्यापासून दूर हो ! कारण असे लिहिले आहे की ‘ देव जो तुझा प्रभु त्याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर . ” ‘ अनुवाद 6 : 13

(src)="b.MAT.4.11.1"> Dɣa Cciṭan iṭṭaxeṛ fell-as .
(src)="b.MAT.4.11.2"> Imiren usant-ed lmalayekkat ɣuṛ-es , iwakken a s-qedcent .
(trg)="b.MAT.4.11.1"> मग सैतान येशूला सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन त्याची देखभाल करू लागले .

(src)="b.MAT.4.12.1"> Mi gesla s Yeḥya yețwaḥbes , Sidna Ɛisa yuɣal ɣer tmurt n Jlili .
(trg)="b.MAT.4.12.1"> नंतर योहानाला तुरूंगात टाकले आहे हे ऐकून येशू गालीलास परतला .

(src)="b.MAT.4.13.1"> Iffeɣ si taddart n Naṣaret , iṛuḥ ad izdeɣ di Kafernaḥum ; ț-țamdint yyellan rrif n lebḥeṛ di leǧwahi n tmura n Zabulun d Nefṭali ,
(trg)="b.MAT.4.13.1"> परंतू तो नासरेथ येथे राहिला नाही , तर गालील सरोवराजवळील कफर्णहूम नगरात जाऊन राहिला . जबुलून व नफताली ह्या प्रदेशांना लागुनच कफर्णहूम नगर आहे .

(src)="b.MAT.4.14.1"> iwakken ad yedṛu wayen yenna nnbi Iceɛya :
(trg)="b.MAT.4.14.1"> यशया ह्या संदेष्ट्याने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे यासाठी हे झाले . यशयाने वर्तविलेले भविष्य असे होते :

(src)="b.MAT.4.15.1"> A tamurt n Zabulun akk-d Nefṭali , a timura iqeṛben lebḥeṛ akkin i wasif n Urdun , a tamurt n Jlili i deg zedɣen leǧnas ur nelli ara n wat Isṛail ,
(trg)="b.MAT.4.15.1"> जबुलून आणि नफताली प्रांत समुद्राकडे येणारे मार्ग , यार्देन नदीपलीकडचा प्रदेश व यहूदीतरांचा गालील यांमधील-

(src)="b.MAT.4.16.1"> agdud-nni yezgan di ṭṭlam , iwala tafat tameqqrant , wid izedɣen di ṭṭlam n lmut , tceṛq-ed fell-asen tafat !
(trg)="b.MAT.4.16.1"> अंधारात वावरणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला . मरणाचे सावट असलेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी प्रकाश अवतरला . ” यशया 9 : 1-2

(src)="b.MAT.4.17.1"> Seg imiren , Sidna Ɛisa yebda yețbecciṛ yeqqaṛ : Tubet , uɣalet-ed ɣer webrid , axaṭer tagelda n igenwan tqeṛṛeb-ed .
(trg)="b.MAT.4.17.1"> त्योवेळेपासून येशू उपदेश करू लागला व म्हणू लागला की , “ पश्चात्ताप करा , कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे . ” ( मार्क 1 : 16-20 ; लूक 5 : 1-11 )

(src)="b.MAT.4.18.1"> Mi gțeddu Sidna Ɛisa ɣef rrif n lebḥeṛ n Jlili , iwala sin iḥewwaten : SSemɛun ițțusemman Buṭrus akk-d gma-s Andriyus .
(src)="b.MAT.4.18.2"> Llan ṭeggiṛen icebbaken-nsen ɣer lebḥeṛ , țṣeggiḍen .
(trg)="b.MAT.4.18.1"> नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना पाहिले . ते कोळी होते . ते जाळे टाकून मासे धरीत होते .

(src)="b.MAT.4.19.1"> Yenna-yasen : Ddut-ed yid-i , a kkun-rreɣ d iṣeggaḍen n yemdanen .
(trg)="b.MAT.4.19.1"> तो त्यांना म्हणाला , “ तुम्ही माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन . ”

(src)="b.MAT.4.20.1"> Dɣa imiren kan , ǧǧan icebbaken nsen , ddan yid-es .
(trg)="b.MAT.4.20.1"> मग ते मागेपुढे न पाहता लगेच जाळे टाकून देऊन ते त्याच्या मागे चालू लागले .

(src)="b.MAT.4.21.1"> Mi gerna yelḥa kra , iwala sin watmaten nniḍen : Yeɛqub d Yuḥenna yellan d arraw n Zabadi .
(src)="b.MAT.4.21.2"> LLlan akk-d baba-tsen di teflukt , țxiḍin icebbaken-nsen .
(trg)="b.MAT.4.21.1"> तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर नावेत आपली जाळी नीट करताना पाहिले . आणि त्याने त्यांना बोलावले .

(src)="b.MAT.4.22.1"> Yessawel-asen , imiren kan ǧǧan dinna baba-tsen , taflukt-nni , ṛuḥen ddan yid-es .
(trg)="b.MAT.4.22.1"> तेव्हा ते आपली नाव व आपले वडील यांना सोडून त्याच्या मागे गेले .

(src)="b.MAT.4.23.1"> Syenna , Sidna Ɛisa yekka-d tamurt n Jlili meṛṛa , yesselmad di leǧwameɛ n wat Isṛail , yețbecciṛ lexbaṛ n lxiṛ n tgeldit n Ṛebbi , isseḥlay yal aṭan d yal leɛyubat n lɣaci .
(trg)="b.MAT.4.23.1"> येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला , येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली . येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली .

(src)="b.MAT.4.24.1"> Slan yis ula di tmurt n Surya meṛṛa ; țțawin-as-ed imuḍan i ghelken si mkul aṭan : wid ițwamelken , wid iwumi yețṛuḥu leɛqel akk-d wukrifen .
(src)="b.MAT.4.24.2"> Sidna Ɛisa isseḥla-ten akk .
(trg)="b.MAT.4.24.1"> येशूविषयीची बातमी सर्व सूरीया देशभर पसरली ; मग जे दुखणेकरी होते , ज्यांना नाना प्रकारचे रोग व आजार होते , ज्यांना भूतबाधा झाली होती , जे फेफरेकरी व पक्षाघाती होते अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणी त्याने त्यांना बरे केले .

(src)="b.MAT.5.1.1"> Mi gwala annect-nni n lɣaci , Sidna Ɛisa yuli ɣer wedrar iqqim .
(src)="b.MAT.5.1.2"> Inelmaden-is qeṛṛben ɣuṛ-es ,
(trg)="b.MAT.5.1.1"> येशूने तेथे पुष्कळ लोक पाहिले . म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला , मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले .

(src)="b.MAT.5.2.1"> dɣa ibda isselmad-iten :
(trg)="b.MAT.5.2.1"> आणि त्याने त्यांना शिकविण्यास सरुवात केली . तो म्हणाला ,

(src)="b.MAT.5.3.1"> D iseɛdiyen wid ițeddun s neyya , aaxaṭer tagelda n igenwan d ayla-nsen !
(trg)="b.MAT.5.3.1"> “ जे आत्म्याने दीन ते धन्य , कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे .

(src)="b.MAT.5.4.1"> D iseɛdiyen wid ițrun , axaṭer ad țwaṣebbṛen !
(trg)="b.MAT.5.4.1"> जे शोक करतात ते धन्य , कारण त्याचे सांत्वन करण्यात येईल .

(src)="b.MAT.5.5.1"> D iseɛdiyen wid ḥninen , aaxaṭer ad weṛten tamurt i sen-iwɛed Sidi Ṛebbi !
(trg)="b.MAT.5.5.1"> जे नम्र ते धन्य , कारण त्यांना वचनदत्त भूमीचे वतन मिळेल .

(src)="b.MAT.5.6.1"> D iseɛdiyen wid illuẓen , iffuden lḥeqq , axaṭer ad ṛwun !
(trg)="b.MAT.5.6.1"> ज्यांना नीतीने वागण्याची तहान व भूक लागली आहे ते धन्य , कारण ते तृप्त होतील .

(src)="b.MAT.5.7.1"> D iseɛdiyen wid yesɛan ṛṛeḥma deg wulawen-nsen , aaxaṭer ad iḥunn fell-asen Sidi Ṛebbi !
(trg)="b.MAT.5.7.1"> जे दयाळू ते धन्य , कारण त्यांचावर दया करण्यत येईल .

(src)="b.MAT.5.8.1"> D iseɛdiyen wid iwumi yeṣfa wul , axaṭer ad walin Sidi Ṛebbi !
(trg)="b.MAT.5.8.1"> जे अंत : करणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील .

(src)="b.MAT.5.9.1"> D iseɛdiyen wid i d-isrusun talwit , aad țțusemmin d arraw n Sidi Ṛebbi !
(trg)="b.MAT.5.9.1"> जे शांति करणारे ते धन्य , कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल .

(src)="b.MAT.5.10.1"> D iseɛdiyen wid ițțuqehṛen ɣef lḥeqq , aaxaṭer ddewla igenwan d ayla-nsen !
(trg)="b.MAT.5.10.1"> नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे .

(src)="b.MAT.5.11.1"> D iseɛdiyen ara tilim , m ' ara kkun-regmen , mm ' ara tețwaqehṛem , m ' ara xedmen deg-wen lbaṭel ɣef ddemma-w .
(trg)="b.MAT.5.11.1"> “ जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील , तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आहात .

(src)="b.MAT.5.12.1"> Feṛḥet , ilit di lfeṛḥ , axaṭer ṛṛezq-nwen d ameqqran deg igenwan , aakka i țwaqehṛen lenbiya i kkun-id izwaren .
(trg)="b.MAT.5.12.1"> आनंद करा आणि उल्हास करा , कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे ; कारण जे संदेष्टे तुमच्यापूर्वी होते त्यांचा त्यांनी तसाच छळ केला . ( मार्क 9 : 50 ; लूक 14 : 34-35 )