# he/Hebrew.xml.gz
# mr/Marathi.xml.gz


(src)="b.GEN.1.1.1"> בראשית ברא אלהים את השמים ואת הארץ ׃
(trg)="b.GEN.1.1.1"> देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली .

(src)="b.GEN.1.2.1"> והארץ היתה תהו ובהו וחשך על פני תהום ורוח אלהים מרחפת על פני המים ׃
(trg)="b.GEN.1.2.1"> सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती ; पृथ्वीवर काहीही नव्हते . अंधाराने जलाशय झाकलेले होते ; आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता

(src)="b.GEN.1.3.1"> ויאמר אלהים יהי אור ויהי אור ׃
(trg)="b.GEN.1.3.1"> नंतर देव बोलला , “ प्रकाश होवो ” आणि प्रकाश चमकू लागला .

(src)="b.GEN.1.4.1"> וירא אלהים את האור כי טוב ויבדל אלהים בין האור ובין החשך ׃
(trg)="b.GEN.1.4.1"> देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला कळले की तो चांगला आहे . नंतर देवाने अंधारापासून प्रकाश वेगळा केला .

(src)="b.GEN.1.5.1"> ויקרא אלהים לאור יום ולחשך קרא לילה ויהי ערב ויהי בקר יום אחד ׃
(trg)="b.GEN.1.5.1"> देवाने प्रकाशाला “ दिवस ” व अंधाराला “ रात्र ” अशी नावे दिली . संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली . हा झाला पहिला दिवस .

(src)="b.GEN.1.6.1"> ויאמר אלהים יהי רקיע בתוך המים ויהי מבדיל בין מים למים ׃
(trg)="b.GEN.1.6.1"> नंतर देव बोलला , “ जलांस दुभागण्याकरिता जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो . ”

(src)="b.GEN.1.7.1"> ויעש אלהים את הרקיע ויבדל בין המים אשר מתחת לרקיע ובין המים אשר מעל לרקיע ויהי כן ׃
(trg)="b.GEN.1.7.1"> तेव्हा देवाने अंतराळ केले आणि अंतराळावरच्या व खालच्या जलांस वेगळे केले .

(src)="b.GEN.1.8.1"> ויקרא אלהים לרקיע שמים ויהי ערב ויהי בקר יום שני ׃
(trg)="b.GEN.1.8.1"> देवाने अंतराळास “ आकाश ” असे नांव दिले . संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली . हा झाला दुसरा दिवस .

(src)="b.GEN.1.9.1"> ויאמר אלהים יקוו המים מתחת השמים אל מקום אחד ותראה היבשה ויהי כן ׃
(trg)="b.GEN.1.9.1"> नंतर देव बोलला , “ अंतराळाखालील पाणी एकत्र गोळा होवो व कोरडी जमीन दिसून येवो . ” आणि तसे घडले ,

(src)="b.GEN.1.10.1"> ויקרא אלהים ליבשה ארץ ולמקוה המים קרא ימים וירא אלהים כי טוב ׃
(trg)="b.GEN.1.10.1"> देवाने कोरड्या जमिनीस “ भूमि ” आणि एकत्र झालेल्या जलसंचयास “ समुद्र ” अशी नावे दिली . आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे .

(src)="b.GEN.1.11.1"> ויאמר אלהים תדשא הארץ דשא עשב מזריע זרע עץ פרי עשה פרי למינו אשר זרעו בו על הארץ ויהי כן ׃
(trg)="b.GEN.1.11.1"> मग देव बोलला , “ गवत , बीज देणाऱ्या वनस्पती आणि फळे देणाऱ्या वनस्पती पृथ्वीवर वाढोत . फळझाडे बिया असलेली फळे तयार करतील आणि प्रत्येक वनस्पती आपल्या जातीच्याच बिया तयार करील अशा वनस्पती पृथ्वीवर वाढोत . ” आणि तसे झाले .

(src)="b.GEN.1.12.1"> ותוצא הארץ דשא עשב מזריע זרע למינהו ועץ עשה פרי אשר זרעו בו למינהו וירא אלהים כי טוב ׃
(trg)="b.GEN.1.12.1"> गवत , आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळ झाडे भूमीने उपजविली . देवाने पाहिले की हे चांगले आहे .

(src)="b.GEN.1.13.1"> ויהי ערב ויהי בקר יום שלישי ׃
(trg)="b.GEN.1.13.1"> संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली . हा झाला तिसरा दिवस .

(src)="b.GEN.1.14.1"> ויאמר אלהים יהי מארת ברקיע השמים להבדיל בין היום ובין הלילה והיו לאתת ולמועדים ולימים ושנים ׃
(trg)="b.GEN.1.14.1"> मग देव बोलला “ दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योति होवोत व त्या विशेष चिन्हे , आणि विशेष मेळावे , ऋतू , दिवस , आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत .

(src)="b.GEN.1.15.1"> והיו למאורת ברקיע השמים להאיר על הארץ ויהי כן ׃
(trg)="b.GEN.1.15.1"> पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशात त्या ज्योति होवोत . ” आणि तसे झाले .

(src)="b.GEN.1.16.1"> ויעש אלהים את שני המארת הגדלים את המאור הגדל לממשלת היום ואת המאור הקטן לממשלת הלילה ואת הכוכבים ׃
(trg)="b.GEN.1.16.1"> देवाने दोन मोठ्या ज्योति निर्माण केल्या . दिवसावर सत्ता चालविण्यासाठी मोठी ज्योति सूर्य आणि रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी लहान ज्योति , चंद्र , आणि त्याने तारेही निर्माण केले .

(src)="b.GEN.1.19.1"> ויהי ערב ויהי בקר יום רביעי ׃
(trg)="b.GEN.1.19.1"> संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली . हा झाला चौधा दिवस .

(src)="b.GEN.1.20.1"> ויאמר אלהים ישרצו המים שרץ נפש חיה ועוף יעופף על הארץ על פני רקיע השמים ׃
(trg)="b.GEN.1.20.1"> मग देव बोलला , “ जलामध्ये जीवजंतूचे थवेच्या थवे उत्पन्न होवोत . आणि पृथ्वीवर आकाशात पक्षी उडोबागडोत ” -

(src)="b.GEN.1.21.1"> ויברא אלהים את התנינם הגדלים ואת כל נפש החיה הרמשת אשר שרצו המים למינהם ואת כל עוף כנף למינהו וירא אלהים כי טוב ׃
(trg)="b.GEN.1.21.1"> समुद्रातील प्रचंड जलचर म्हणजे पाण्यात फिरणारे व अनेक जातीचे व प्रकारचे जलप्राणी देवाने उत्पन्न केले . तसेच आकाशात उडणारे निरनिराळड्या जातीचे पक्षीही देवाने उत्पन्न केले आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे .

(src)="b.GEN.1.22.1"> ויברך אתם אלהים לאמר פרו ורבו ומלאו את המים בימים והעוף ירב בארץ ׃
(trg)="b.GEN.1.22.1"> देवाने त्यांना आशीर्वाद दिला , “ फलद्रूप व्हा , वाढा , समुद्रातील पाणी व्यापून व भरुन टाका आणि पक्षी बहुगुणित होवोत व पृथ्वी व्यापून टाकोत . ”

(src)="b.GEN.1.23.1"> ויהי ערב ויהי בקר יום חמישי ׃
(trg)="b.GEN.1.23.1"> संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली हा होता पाचवा दिवस .

(src)="b.GEN.1.24.1"> ויאמר אלהים תוצא הארץ נפש חיה למינה בהמה ורמש וחיתו ארץ למינה ויהי כן ׃
(trg)="b.GEN.1.24.1"> मग देव बोलला , “ निरनिराळया जातीचे पशू , मोठे प्राणी वेगवेगळड्या जातीचे सरपटणारे व रांगणारे लहान प्राणी असे जीवधारी प्राणी पृथ्वीवर उत्पन्न होवोत . ते आपापल्या जातीचे अनेक प्राणी निर्माण करोत . ” आणि तसे सर्व झाले .

(src)="b.GEN.1.25.1"> ויעש אלהים את חית הארץ למינה ואת הבהמה למינה ואת כל רמש האדמה למינהו וירא אלהים כי טוב ׃
(trg)="b.GEN.1.25.1"> असे देवाने वनपशू , पाळीव जनावरे , सरपटत जाणारे लहान प्राणी व वेगवेगळया जातीचे जीवधारी प्राणी निर्माण केले . आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे .

(src)="b.GEN.1.26.1"> ויאמר אלהים נעשה אדם בצלמנו כדמותנו וירדו בדגת הים ובעוף השמים ובבהמה ובכל הארץ ובכל הרמש הרמש על הארץ ׃
(trg)="b.GEN.1.26.1"> मग देव बोलला , “ आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करु ; समुद्रातील मासे , आकाशातील पक्षी , सर्व वनपशू , मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील . ”

(src)="b.GEN.1.27.1"> ויברא אלהים את האדם בצלמו בצלם אלהים ברא אתו זכר ונקבה ברא אתם ׃
(trg)="b.GEN.1.27.1"> तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला ; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला ; नर व नारी अशी ती निर्माण केली .

(src)="b.GEN.1.28.1"> ויברך אתם אלהים ויאמר להם אלהים פרו ורבו ומלאו את הארץ וכבשה ורדו בדגת הים ובעוף השמים ובכל חיה הרמשת על הארץ ׃
(trg)="b.GEN.1.28.1"> देवाने त्यांना आशीर्वाद दिला ; देव त्यांना म्हणाला , “ फलद्रूप व्हा , बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका ; ती आपल्या सत्तेखाली आणा ; समुद्रातील मासे , आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा . ”

(src)="b.GEN.1.29.1"> ויאמר אלהים הנה נתתי לכם את כל עשב זרע זרע אשר על פני כל הארץ ואת כל העץ אשר בו פרי עץ זרע זרע לכם יהיה לאכלה ׃
(trg)="b.GEN.1.29.1"> देव म्हणाला , “ धान्य देणाऱ्या सर्व वनस्पती आणि आपापल्या फळामध्येच वृक्षाचे बीज असलेली सर्व फळझाडे मी तुम्हांस दिली आहेत . ही तुम्हांकरिता अन्न होतील .

(src)="b.GEN.1.30.1"> ולכל חית הארץ ולכל עוף השמים ולכל רומש על הארץ אשר בו נפש חיה את כל ירק עשב לאכלה ויהי כן ׃
(trg)="b.GEN.1.30.1"> तसेच पृथ्वीवरील सर्व पशू , आकाशातील सर्व पक्षी आणि जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी यांच्याकरिता अन्न म्हणून मी हिरव्या वनस्पती दिल्या आहेत . ” आणि सर्व तसे झाले .

(src)="b.GEN.1.31.1"> וירא אלהים את כל אשר עשה והנה טוב מאד ויהי ערב ויהי בקר יום הששי ׃
(trg)="b.GEN.1.31.1"> आपण केलेले सर्वकाही फार चांगले आहे असे देवाने पाहिले . संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली . हा झाला सहावा दिवस .

(src)="b.GEN.2.1.1"> ויכלו השמים והארץ וכל צבאם ׃
(trg)="b.GEN.2.1.1"> याप्रमाणे पृथ्वी , आकाश आणि त्यांतील सर्वकाही पूर्ण करुन झाले .

(src)="b.GEN.2.2.1"> ויכל אלהים ביום השביעי מלאכתו אשר עשה וישבת ביום השביעי מכל מלאכתו אשר עשה ׃
(trg)="b.GEN.2.2.1"> देवाने आपण करीत असलेले काम संपवले म्हणून सातव्या दिवशी त्याने काम करण्यापासून विसावा घेतला .

(src)="b.GEN.2.3.1"> ויברך אלהים את יום השביעי ויקדש אתו כי בו שבת מכל מלאכתו אשר ברא אלהים לעשות ׃
(trg)="b.GEN.2.3.1"> देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला व विशेष ठरविला कारण त्या दिवशी जग निर्माण करताना त्याने केलेल्या सर्व कामापासून विसावा घेतला .

(src)="b.GEN.2.4.1"> אלה תולדות השמים והארץ בהבראם ביום עשות יהוה אלהים ארץ ושמים ׃
(trg)="b.GEN.2.4.1"> हा आकाश व पृथ्वी निर्माण केल्याचा इतिहास आहे . देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली त्या वेळी जे जे घडले त्यांच्या उत्पत्ति क्रमाविषयीचा हा वृत्तान्त आहे .

(src)="b.GEN.2.5.1"> וכל שיח השדה טרם יהיה בארץ וכל עשב השדה טרם יצמח כי לא המטיר יהוה אלהים על הארץ ואדם אין לעבד את האדמה ׃
(trg)="b.GEN.2.5.1"> त्यापूर्वी पृथ्वीवर वनस्पती नव्हती , शेतात काही उगवले नव्हते . कारण परमेश्वराने अद्याप पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता .

(src)="b.GEN.2.6.1"> ואד יעלה מן הארץ והשקה את כל פני האדמה ׃
(trg)="b.GEN.2.6.1"> पृथ्वीवरुन धुके वर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिपंडले व पसरले जात असे .

(src)="b.GEN.2.7.1"> וייצר יהוה אלהים את האדם עפר מן האדמה ויפח באפיו נשמת חיים ויהי האדם לנפש חיה ׃
(trg)="b.GEN.2.7.1"> नंतर परमेश्वर देवाने जामिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जीवंत प्राणी झाला .

(src)="b.GEN.2.8.1"> ויטע יהוה אלהים גן בעדן מקדם וישם שם את האדם אשר יצר ׃
(trg)="b.GEN.2.8.1"> मग परमेश्वर देवाने पूर्वेकडे एदेन नावाच्या जागेत एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्याला ठेवले .

(src)="b.GEN.2.9.1"> ויצמח יהוה אלהים מן האדמה כל עץ נחמד למראה וטוב למאכל ועץ החיים בתוך הגן ועץ הדעת טוב ורע ׃
(trg)="b.GEN.2.9.1"> परमेश्वर देवाने सुदंर दिसणारी अन्नासाठी उत्तम अशी सर्व जातीची झाडे बागेमध्ये उगवली आणि बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्यावाईटाचे ज्ञान देणारे झाड अशी झाडे लावली .

(src)="b.GEN.2.10.1"> ונהר יצא מעדן להשקות את הגן ומשם יפרד והיה לארבעה ראשים ׃
(trg)="b.GEN.2.10.1"> एदेन बागेत एक नदी उगम पावली व तिने सर्व बागेला पाणी पुरवले . नंतर ती नदी विभागून तिच्या चार वेगळया नद्या झाल्या .

(src)="b.GEN.2.11.1"> שם האחד פישון הוא הסבב את כל ארץ החוילה אשר שם הזהב ׃
(trg)="b.GEN.2.11.1"> पहिल्या नदिचे नाव पीशोन होते . ही सर्व हवीला देशाला वेढा घालून वाहाते

(src)="b.GEN.2.12.1"> וזהב הארץ ההוא טוב שם הבדלח ואבן השהם ׃
(trg)="b.GEN.2.12.1"> त्या देशात चांगल्या प्रतीचे सोने सांपडते . तेथे मोती व गोमेद ही रत्ने सापडतात

(src)="b.GEN.2.13.1"> ושם הנהר השני גיחון הוא הסובב את כל ארץ כוש ׃
(trg)="b.GEN.2.13.1"> दुसऱ्या नदीचे नाव गीहोन आहे , ही सगळ्या कूश म्हणजे इथिओपिया देशाभोवती वाहते .

(src)="b.GEN.2.14.1"> ושם הנהר השלישי חדקל הוא ההלך קדמת אשור והנהר הרביעי הוא פרת ׃
(trg)="b.GEN.2.14.1"> तिसऱ्या नदिचे नाव हिद्दकेल . ही अश्शूर म्हणजे असीरिया देशाच्या पूर्वेस वहात जाते . चौथ्या नदीचे नाव फरात म्हणजे युफ्रेटीस असे आहे .

(src)="b.GEN.2.15.1"> ויקח יהוה אלהים את האדם וינחהו בגן עדן לעבדה ולשמרה ׃
(trg)="b.GEN.2.15.1"> परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत तिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले .

(src)="b.GEN.2.16.1"> ויצו יהוה אלהים על האדם לאמר מכל עץ הגן אכל תאכל ׃
(trg)="b.GEN.2.16.1"> परमेश्वराने मनुष्याला ही आज्ञा दिली ; परमेश्वर म्हणाला , “ बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खाऊ शकतो .

(src)="b.GEN.2.17.1"> ומעץ הדעת טוב ורע לא תאכל ממנו כי ביום אכלך ממנו מות תמות ׃
(trg)="b.GEN.2.17.1"> परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे फुळ तू खाऊ नको ; जर त्या झाडाचे फळ तू खाशील तर तू नक्की मरशील . ”

(src)="b.GEN.2.18.1"> ויאמר יהוה אלהים לא טוב היות האדם לבדו אעשה לו עזר כנגדו ׃
(trg)="b.GEN.2.18.1"> नंतर परमेश्वर बोलला , “ मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही ; मी त्याच्यासाठी योग्य मदतनीस निर्माण करीन . ”

(src)="b.GEN.2.19.1"> ויצר יהוה אלהים מן האדמה כל חית השדה ואת כל עוף השמים ויבא אל האדם לראות מה יקרא לו וכל אשר יקרא לו האדם נפש חיה הוא שמו ׃
(trg)="b.GEN.2.19.1"> परमेश्वराने मातीतून शेतातील सर्व जातीचे प्राणी आणि आकाशातील सर्वजातीचे पक्षी उत्पन्न केले आणि त्यांना मनुष्याकडे नेले आणि मनुष्याने म्हणजे आदामाने त्या सर्वांना नावे दिली .

(src)="b.GEN.2.20.1"> ויקרא האדם שמות לכל הבהמה ולעוף השמים ולכל חית השדה ולאדם לא מצא עזר כנגדו ׃
(trg)="b.GEN.2.20.1"> आदामाने सर्व पाळीव प्राणी , आकाशातील सर्वपक्षी आणि सर्व वनपशू म्हणजे जंगलातील , रानावनातील जनावरे यांना नावे दिली . आदामाने हे सर्व पशू - पक्षी पाहिले परंतु त्याला त्यांच्यात आपणासाठी योग्य असा मदतनीस सापडला नाही .

(src)="b.GEN.2.21.1"> ויפל יהוה אלהים תרדמה על האדם ויישן ויקח אחת מצלעתיו ויסגר בשר תחתנה ׃
(trg)="b.GEN.2.21.1"> तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली . आणि तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली व ती जागा चमडचाने बंद केली . तेव्हा ती मांसाने भरुन आली .

(src)="b.GEN.2.22.1"> ויבן יהוה אלהים את הצלע אשר לקח מן האדם לאשה ויבאה אל האדם ׃
(trg)="b.GEN.2.22.1"> परमेश्वराने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले .

(src)="b.GEN.2.23.1"> ויאמר האדם זאת הפעם עצם מעצמי ובשר מבשרי לזאת יקרא אשה כי מאיש לקחה זאת ׃
(trg)="b.GEN.2.23.1"> 2तेव्हा आदाम म्हणाला , “ आता ही मात्र माझ्यासारखी आहे . तिची हाडे माझ्या हाडा पासून व तिचे शरीर माझ्या शरीरापासून बनवले आहे . मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो . कारण ती नरापासून बनवलेली आहे . ”

(src)="b.GEN.2.24.1"> על כן יעזב איש את אביו ואת אמו ודבק באשתו והיו לבשר אחד ׃
(trg)="b.GEN.2.24.1"> म्हणून मनुष्य आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ते दोघे एक देह होतील .

(src)="b.GEN.2.25.1"> ויהיו שניהם ערומים האדם ואשתו ולא יתבששו ׃
(trg)="b.GEN.2.25.1"> एदेन बागेत आदाम व त्याची बायको ही दोघे नग्न होती . परंतु त्यांना कसलीच लाज वाटत नव्हती .

(src)="b.GEN.3.1.1"> והנחש היה ערום מכל חית השדה אשר עשה יהוה אלהים ויאמר אל האשה אף כי אמר אלהים לא תאכלו מכל עץ הגן ׃
(trg)="b.GEN.3.1.1"> परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वन्य प्राण्यांमध्ये सर्प हा अतिशय धूर्त आणि हुषार होता . त्याला स्त्रीची फसवणूक करायची होती . त्यावेळी सर्प त्या स्त्रीशी बोलला व तो तिला म्हणाला , “ स्त्रिये , बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नको असे देवाने तुला खरोखरच सांगितले आहे काय ? ”

(src)="b.GEN.3.2.1"> ותאמר האשה אל הנחש מפרי עץ הגן נאכל ׃
(trg)="b.GEN.3.2.1"> स्त्रीने सर्पाला उत्तर दिले , “ नाही . देवाने तसे म्हटले नाही बागेतल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो .

(src)="b.GEN.3.3.1"> ומפרי העץ אשר בתוך הגן אמר אלהים לא תאכלו ממנו ולא תגעו בו פן תמתון ׃
(trg)="b.GEN.3.3.1"> परंतु असे एक झाड आहे की ज्याचे फळ आम्ही खाता कामा नये देवाने आम्हाला सांगितले , ‘ बागेच्या मधोमध असलेल्या झाडाचे फळ तुम्ही मुळीच खाऊ नका . त्या झाडाला स्पर्शही करु नका . नाहीतर तुम्ही मराल . ”

(src)="b.GEN.3.4.1"> ויאמר הנחש אל האשה לא מות תמתון ׃
(trg)="b.GEN.3.4.1"> परंतु सर्प त्या स्त्रीला म्हणाला , “ तुम्ही खरोखर मरणार नाही .

(src)="b.GEN.3.5.1"> כי ידע אלהים כי ביום אכלכם ממנו ונפקחו עיניכם והייתם כאלהים ידעי טוב ורע ׃
(trg)="b.GEN.3.5.1"> कारण देवाला हे माहीत आहे की जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल तर बरे व वाईट काय आहे हे तुम्हांला समजेल आणि तुम्ही देवासारखे व्हाल . ”

(src)="b.GEN.3.6.1"> ותרא האשה כי טוב העץ למאכל וכי תאוה הוא לעינים ונחמד העץ להשכיל ותקח מפריו ותאכל ותתן גם לאישה עמה ויאכל ׃
(trg)="b.GEN.3.6.1"> स्त्रीने पाहिले की ते झाड दिसण्यात सुंदर , त्याचे फळ खाण्यास चांगले व शहाणपण देणारे आहे म्हणून तिने त्या झाडाचे फळ तोडून घेतले व खाल्ले . तिचा नवरा तिच्याबरोबर तेथे होता ; तेव्हा तिने त्या फळातून त्याला थोडे दिले व त्याने ते खाल्ले .

(src)="b.GEN.3.7.1"> ותפקחנה עיני שניהם וידעו כי עירמם הם ויתפרו עלה תאנה ויעשו להם חגרת ׃
(trg)="b.GEN.3.7.1"> तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहो असे त्यांस समजले ; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपासाठी काही वस्त्रे तयार केली व ती घातली .

(src)="b.GEN.3.8.1"> וישמעו את קול יהוה אלהים מתהלך בגן לרוח היום ויתחבא האדם ואשתו מפני יהוה אלהים בתוך עץ הגן ׃
(trg)="b.GEN.3.8.1"> संध्याकाळी परमेश्वर बागेत फिरत होता . त्यावेळी आदामाने आणि त्याच्या बायकोने परमेश्वराचा आवाज ऐकला . आणि त्याच्या नजरेस पडू नये म्हणून ती दोघे परमेश्वरापासून बागेच्या झाडात लपली .

(src)="b.GEN.3.9.1"> ויקרא יהוה אלהים אל האדם ויאמר לו איכה ׃
(trg)="b.GEN.3.9.1"> तेव्हा परमेश्वराने आदामाला हाक मारुन म्हटले , “ तू कोठे आहेस ? ”

(src)="b.GEN.3.10.1"> ויאמר את קלך שמעתי בגן ואירא כי עירם אנכי ואחבא ׃
(trg)="b.GEN.3.10.1"> तो म्हणाला , “ बागेत मी तुझ्या चालण्याचा आवाज ऐकला व मला भीती वाटली कारण मी नग्न होतो आणि म्हणून मी लपलो . ”

(src)="b.GEN.3.11.1"> ויאמר מי הגיד לך כי עירם אתה המן העץ אשר צויתיך לבלתי אכל ממנו אכלת ׃
(trg)="b.GEN.3.11.1"> परमेश्वर त्याला म्हणाला , “ तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले ? ज्या विशेष झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय ? ”

(src)="b.GEN.3.12.1"> ויאמר האדם האשה אשר נתתה עמדי הוא נתנה לי מן העץ ואכל ׃
(trg)="b.GEN.3.12.1"> आदाम म्हणाला , “ तू ही स्त्री माझ्यासाठी मदतनीस म्हणून दिलीस . तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले . ”

(src)="b.GEN.3.13.1"> ויאמר יהוה אלהים לאשה מה זאת עשית ותאמר האשה הנחש השיאני ואכל ׃
(trg)="b.GEN.3.13.1"> मग परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाला , “ तू हे काय केलेस ? ” ती स्त्री म्हणाली , “ सर्पाने मला भुरळ घालून फसविले व म्हणून मी ते फळ खाल्ले . ”

(src)="b.GEN.3.14.1"> ויאמר יהוה אלהים אל הנחש כי עשית זאת ארור אתה מכל הבהמה ומכל חית השדה על גחנך תלך ועפר תאכל כל ימי חייך ׃
(trg)="b.GEN.3.14.1"> म्हणून परमेश्वर सर्पाला म्हणाला , “ तू हे फार वाईट केलेस म्हणून तुझे पण वाईट होईल . तू हे केलेस म्हणून इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा तू अधिक शापित आहेस . तू पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील

(src)="b.GEN.3.15.1"> ואיבה אשית בינך ובין האשה ובין זרעך ובין זרעה הוא ישופך ראש ואתה תשופנו עקב ׃
(trg)="b.GEN.3.15.1"> तू व स्त्री , यांस मी एकमेकांचे शत्रु करीन . तुझी संतती आणि तिची संतती एकमेकाचे शत्रू होतील तिच्या संततीच्या पायाची तू टाच फोडशील पण तो तुझे डोके ठेचील

(src)="b.GEN.3.16.1"> אל האשה אמר הרבה ארבה עצבונך והרנך בעצב תלדי בנים ואל אישך תשוקתך והוא ימשל בך ׃
(trg)="b.GEN.3.16.1"> नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाला , “ तू गरोदर असताना तुला त्रास होईल आणि मुलांना जन्म देते वेळी तुला खूप वेदना होतील . तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील ; आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील . ”

(src)="b.GEN.3.17.1"> ולאדם אמר כי שמעת לקול אשתך ותאכל מן העץ אשר צויתיך לאמר לא תאכל ממנו ארורה האדמה בעבורך בעצבון תאכלנה כל ימי חייך ׃
(trg)="b.GEN.3.17.1"> नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला , “ त्या विशेष झाडाचे फळ खाऊ नको अशी मी तुला आज्ञा दिली होती परंतु तू तुझ्या बायकोने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यास आणि त्या झाडाचे फळ खाल्लेस . तेव्हा मी तुझ्यामुळे भूमीला शाप देत आहे . तू तिजपासून अन्न मिळविण्यासाठी जन्मभर अतिशय कष्ट करशील ;

(src)="b.GEN.3.18.1"> וקוץ ודרדר תצמיח לך ואכלת את עשב השדה ׃
(trg)="b.GEN.3.18.1"> जमीन तुझ्यासाठी काटेकुटे वाढवेल आणि शेतातल्या रानटी वनस्पती तुला खाव्या लागतील .

(src)="b.GEN.3.19.1"> בזעת אפיך תאכל לחם עד שובך אל האדמה כי ממנה לקחת כי עפר אתה ואל עפר תשוב ׃
(trg)="b.GEN.3.19.1"> तू अतिशय श्रम करुन निढळाच्या घामाने भाकर मिळविशीलं तू मरायच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील . आणि नंतर तू पुन्हा माती होशीलं मी तुला मातीतून उत्पन्न केले आहे ; आणि तू मरशील तेव्हा परत मातीला जाऊन मिळशील . ”

(src)="b.GEN.3.20.1"> ויקרא האדם שם אשתו חוה כי הוא היתה אם כל חי ׃
(trg)="b.GEN.3.20.1"> आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले . या जगात जन्म घेणाऱ्या सर्व माणसांची ती आई आहे म्हणून आदामाने तिला हे नाव दिले .

(src)="b.GEN.3.21.1"> ויעש יהוה אלהים לאדם ולאשתו כתנות עור וילבשם ׃
(trg)="b.GEN.3.21.1"> परमेश्वराने आदाम व त्याची बायको हव्वा यांच्यासाठी जनावराच्या चामड्यांची वस्त्रे केली ; आणि ती त्यांना घातली .

(src)="b.GEN.3.22.1"> ויאמר יהוה אלהים הן האדם היה כאחד ממנו לדעת טוב ורע ועתה פן ישלח ידו ולקח גם מעץ החיים ואכל וחי לעלם ׃
(trg)="b.GEN.3.22.1"> परमेश्वर म्हणाला , “ पाहा , मनुष्य आपल्या सारखा झाला आहे . त्याला बरे व वाईट समजते . तर आता कदचित जीवनांच्या झाडावरुन तो फळ घेईल आणि जर का तो ते फळ खाईल तर मग सदासर्वकाळ तो जीवंत राहील . ”

(src)="b.GEN.3.23.1"> וישלחהו יהוה אלהים מגן עדן לעבד את האדמה אשר לקח משם ׃
(trg)="b.GEN.3.23.1"> तेव्हा परमेश्वराने मनुष्याला ज्या जमिनीतून उत्पन्न केले होते तिची मशागत करण्यासाठी एदेन बागेतून बाहेर घालवून दिले .

(src)="b.GEN.3.24.1"> ויגרש את האדם וישכן מקדם לגן עדן את הכרבים ואת להט החרב המתהפכת לשמר את דרך עץ החיים ׃
(trg)="b.GEN.3.24.1"> परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बाग सोडण्याठी भाग पाडले . नंतर परमेश्वराने एदेन बागेची राखण करण्यासाठी बागेच्या पूर्वेकडे करुब देवदूतांना पहारा करण्यास ठेवले . तसेच तेथे जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गचे रक्षण करण्यासाठी गरगर फिरणारी अरनीची एक तलवार ठेवली .

(src)="b.GEN.4.1.1"> והאדם ידע את חוה אשתו ותהר ותלד את קין ותאמר קניתי איש את יהוה ׃
(trg)="b.GEN.4.1.1"> आदाम आणि त्याची बायको हव्वा यांचा लैगिक संबंध आला ; हव्वा गर्भवती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला . त्या मुलाचे नाव काइन असे ठेवले . तेव्हा हव्वा म्हणाली , “ परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुषसतांन लाभले आहे . ”

(src)="b.GEN.4.2.1"> ותסף ללדת את אחיו את הבל ויהי הבל רעה צאן וקין היה עבד אדמה ׃
(trg)="b.GEN.4.2.1"> त्यानंतर हव्वेने आणखी एका बाळाला जन्म दिला . हा मुलगा म्हणजे काइनाचा भाऊ हाबेल होता . हाबेल मेंढपाळ झाला ; काइन शेतकरी झाला .

(src)="b.GEN.4.3.1"> ויהי מקץ ימים ויבא קין מפרי האדמה מנחה ליהוה ׃
(trg)="b.GEN.4.3.1"> काही काळानंतर हंगामाचे वेळी काइनाने परमेश्वराला आदराने दान देण्यासाठी आपल्या शेतातील उत्पन्नातून काही अर्पण आणले .

(src)="b.GEN.4.4.1"> והבל הביא גם הוא מבכרות צאנו ומחלבהן וישע יהוה אל הבל ואל מנחתו ׃
(trg)="b.GEN.4.4.1"> हाबेलानेही आपल्या कळपातील काही मेंढरे देवाला अर्पण म्हणून आणली . त्याने मेंढरांचे सर्वात उत्तम भाग आणले . परमेश्वराने हाबेलाचे अर्पण स्वीकारले .

(src)="b.GEN.4.5.1"> ואל קין ואל מנחתו לא שעה ויחר לקין מאד ויפלו פניו ׃
(trg)="b.GEN.4.5.1"> परतुं काइन आणि त्याचे अर्पण स्वीकारले नाही . यामुळे काइन फार दु : खी झाला व त्याला फार राग आला

(src)="b.GEN.4.6.1"> ויאמר יהוה אל קין למה חרה לך ולמה נפלו פניך ׃
(trg)="b.GEN.4.6.1"> परमेश्वराने काइनाला विचारले , “ तू का रागावलास ? तुझा चेहरा दु : खी का दिसत आहे ?

(src)="b.GEN.4.7.1"> הלוא אם תיטיב שאת ואם לא תיטיב לפתח חטאת רבץ ואליך תשוקתו ואתה תמשל בו ׃
(trg)="b.GEN.4.7.1"> तू जर चांगल्या गोष्टी करशील तर तुझे माझे संबंध चांगले राहतील , मग मी तुझा स्वीकार करीन ; परंतु तू जर वाईट रीतीने चालशील तर ते पाप तुझ्यात राहील व ते पाप तुझ्यावर सत्ता चालवू पाहील ; पण तू त्या पापावर सत्ता चालवली पाहिजेस . ”

(src)="b.GEN.4.8.1"> ויאמר קין אל הבל אחיו ויהי בהיותם בשדה ויקם קין אל הבל אחיו ויהרגהו ׃
(trg)="b.GEN.4.8.1"> काइन आपला भाऊ हाबेल यास म्हणाला , “ चल , आपण जरा शेतात जाऊ या . “ तेव्हा काइनाने हाबेलाला बाहेर शेतात नेले . तेव्हा काइनाने आपला भाऊ हाबेल यावर हल्ला केला व त्याला ठार मारले .

(src)="b.GEN.4.9.1"> ויאמר יהוה אל קין אי הבל אחיך ויאמר לא ידעתי השמר אחי אנכי ׃
(trg)="b.GEN.4.9.1"> काही वेळाने परमेश्वर काइनास म्हणाला , “ तुझा भाऊ हाबेल कोठे आहे ? ” काइनाने उत्तर दिले , “ मला माहीत नाही ; माझ्या भावावर नजर ठेवणे व त्याची काळजी घेणे हे माझे काम आहे काय ? ”

(src)="b.GEN.4.10.1"> ויאמר מה עשית קול דמי אחיך צעקים אלי מן האדמה ׃
(trg)="b.GEN.4.10.1"> नंतर परमेश्वर म्हणाला , “ तू हे काय केलेस ?

(src)="b.GEN.4.11.1"> ועתה ארור אתה מן האדמה אשר פצתה את פיה לקחת את דמי אחיך מידך ׃
(trg)="b.GEN.4.11.1"> तू तुझ्या भावाला ठार केलेस . त्याचे रक्त मला जमिनीतून हाका मारीत आहे ; त्याचे रक्त तुझ्या हातातून घेण्यास भूमीने आपले तोंड उघडले आहे . ह्याच कारणाने तू शापित आहेस . भूमी तुला नकारेल .

(src)="b.GEN.4.12.1"> כי תעבד את האדמה לא תסף תת כחה לך נע ונד תהיה בארץ ׃
(trg)="b.GEN.4.12.1"> पूर्वी तू जमिनीची मशागत केलीस आणि तिने तुला चांगले पीक दिले . पण आता तू मशागत करशील तरी ती भूमी तुला पीक देणार नाही . तू पृथ्वीवर एका ठिकाणी घर करुन राहणार नाहीस तर तू भटकत राहशील व परागंदा होशील . ”

(src)="b.GEN.4.13.1"> ויאמר קין אל יהוה גדול עוני מנשא ׃
(trg)="b.GEN.4.13.1"> मग काइन म्हणाला , “ ही शिक्षा मी सहन करु शकणार नाही इतकी भारी आहे .

(src)="b.GEN.4.14.1"> הן גרשת אתי היום מעל פני האדמה ומפניך אסתר והייתי נע ונד בארץ והיה כל מצאי יהרגני ׃
(trg)="b.GEN.4.14.1"> पहा तू मला ह्या माझ्या भूमिवरुन दूर पाठवीत आहेस , मी तुला पाहू शकणार नाही किंवा तुझ्या जवळ मला येता येणार नाही ; मला घरदार असणार नाही . या पृथ्वीवर तू मला ठिकठिकाणी भटकणे व परागंदा होणे लादले आहेस . मी जर कोणाच्या हाती सापडेन तर तो मला ठार मारुन टाकेल . ”

(src)="b.GEN.4.15.1"> ויאמר לו יהוה לכן כל הרג קין שבעתים יקם וישם יהוה לקין אות לבלתי הכות אתו כל מצאו ׃
(trg)="b.GEN.4.15.1"> मग परमेश्वर काइनास म्हणाला , “ मी असे घडू देणार नाही . कारण तुला जर कोणी ठार मारील तर त्याला मी कितीतरी अधिक पटीने शिक्षा देईन . ” मग काइनाला कोणी मारु नये म्हणून परमेश्वराने त्याच्यावर एक विशिष्ठ खूण केली .

(src)="b.GEN.4.16.1"> ויצא קין מלפני יהוה וישב בארץ נוד קדמת עדן ׃
(trg)="b.GEN.4.16.1"> काइन परमेश्वरा समोरुन निघून गेला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात जाऊन राहिला .

(src)="b.GEN.4.17.1"> וידע קין את אשתו ותהר ותלד את חנוך ויהי בנה עיר ויקרא שם העיר כשם בנו חנוך ׃
(trg)="b.GEN.4.17.1"> काइन आपल्या पत्नीजवळ जाऊन निजला तेव्हा ती गर्भवती होऊन तीने हनोख नावाच्या मुलाला जन्म दिला ; काइनाने एक नगर बांधले तेव्हा त्याने त्या नगराला आपल्या मुलाचेच हनोख हे नाव दिले .

(src)="b.GEN.4.18.1"> ויולד לחנוך את עירד ועירד ילד את מחויאל ומחייאל ילד את מתושאל ומתושאל ילד את למך ׃
(trg)="b.GEN.4.18.1"> हनोखाला हराद नावाचा मुलगा झाला ; हरादाला महूयाएल झालां महूयाएलास मथुशाएल झाला ; आणि मथुशाएलास लामेख झाला .

(src)="b.GEN.4.19.1"> ויקח לו למך שתי נשים שם האחת עדה ושם השנית צלה ׃
(trg)="b.GEN.4.19.1"> लामेखाने दोन बायका केल्या . पहिलीचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला .

(src)="b.GEN.4.20.1"> ותלד עדה את יבל הוא היה אבי ישב אהל ומקנה ׃
(trg)="b.GEN.4.20.1"> आदाने याबालास जन्म दिला ; तो तंबूत राहाणाऱ्या व गुरेढोरे पाळणाऱ्या लोकांचा मूळ पुरुष झाला .

(src)="b.GEN.4.21.1"> ושם אחיו יובל הוא היה אבי כל תפש כנור ועוגב ׃
(trg)="b.GEN.4.21.1"> आदाला आणखी एक मुलगा झाला . ( त्याचे नाव युबाल ; हा याबालाचा भाऊ ) ; युबाल तंतुवाद्दे , व वायुवाद्दे म्हणजे वीणा व बासरी वाजविणाऱ्या कलावंताचा मूळ पुरुष झाला .

(src)="b.GEN.4.22.1"> וצלה גם הוא ילדה את תובל קין לטש כל חרש נחשת וברזל ואחות תובל קין נעמה ׃
(trg)="b.GEN.4.22.1"> सिल्ला हिला तुबल - काइन झाला ; तो तांब्याची व लोखंडाची कामे करणाऱ्या लोकांचा मूळ पुरुष झाला . तुबल काइनास नामा नावाची बहीण होती .