# mr/7opHWpu2fYcG.xml.gz
# nn/7opHWpu2fYcG.xml.gz


(src)="1"> आता , जर अध्यक्ष ओबामा यानी मला पुढचा " गणित सम्राट " केला , तर मी त्याना असा एक प्रस्ताव देईन जो मला वाटतं या देशातील गणित शिक्षणात फार मोठी सुधारणा घडवून आणेल . आणि त्याची अंमलबजावणी करणेही सोपे आणि स्वस्त असेल . आपल्या गणिताच्या अभ्यासक्रमाचा पाया अंकगणित आणि बीजगणित आहे . आणि त्यानंतर आपण जे जे काही शिकतो ते एकाच विषयाकडे घेऊन जाते . आणि त्या प्रसूचीचा शिरोबिंदू असतो , कलनशास्त्र . आणि मी हे सांगायला इथे आलोय की माझ्या मते तो या प्रसूचीचा चुकीचा शिरोबिंदू आहे ... योग्य शिरोबिंदू - जो आपल्या सर्व विद्यार्थ्याना , प्रत्येक माध्यमिक शाळा उत्तीर्ण झालेल्याला माहीत असायला हवा -- तो म्हणजे संख्याशास्त्र : संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र .
(trg)="1"> Viss President Obama inviterte meg til å verte den neste matematikk- tsaren , ville eg hatt eit framlegg til han som eg trur ville ha betra matematikkutdanninga i landet stort .
(trg)="2"> Og det ville ha vore både lett og billeg å gjennomføre .
(trg)="3"> Matematikkpensumet me har er basert på grunnleggjande aritmetikk og algebra .

(src)="2"> ( टाळ्यांचा कडकडाट ) माझे मत चुकीच्या अर्थाने घेऊ नका . कलनशास्त्र हा महत्त्वाचा विषय आहे . मानवी मनातून निर्माण झालेल्या महान गोष्टींपैकी एक . निसर्गाचे नियम कलनशास्त्राच्या भाषेत लिहिलेले आहेत . आणि गणित , शास्त्र , अभियांत्रिकी , अर्थशास्त्र शिकणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने कॉलेजचं पहिलं वर्ष पूर्ण व्हायच्या आत कलनशास्त्र नक्कीच शिकले पाहिजे . पण , गणिताचा प्राध्यापक म्हणून मी इथे हे सांगायला आलोय , की फार थोडे लोक वास्तवात कलनशास्त्र जाणीवपूर्वक , अर्थपूर्ण प्रकारे , रोजच्या आयुष्यात वापरतात . पण , संख्याशास्त्र -- हा असा विषय आहे जो तुम्ही रोज वापरू शकता आणि , वापरला पाहिजे . हो ना ?
(trg)="7"> ( Applaus )
(trg)="8"> Eg meiner , misforstå meg rett -- funksjonsanalyse er eit viktig emne .
(trg)="9"> Det er ei av mennesket sine største intellektuelle bedrifter .

(src)="3"> ( संख्याशास्त्र म्हणजे ) धोका . बक्षीस . अनियमितता . माहिती समजून घेणे . मला वाटतं जर आपल्या विद्यार्थ्याना , आपल्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याना -- जर सर्व अमेरिकन नागरिकाना -- संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र माहीत असतं , तर आपण आज ज्या आर्थिक विचक्यात आहोत त्यात अडकलो नसतो . इतकंच नाही -- धन्यवाद -- इतकंच नाही ... [ तर ] योग्य पद्धतीने शिकवल्यास , ते आनंददायी होऊ शकते . मला असं म्हणायचंय , संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र , म्हणजे खेळ आणि जुगाराचं गणित . कलाचा बारकाईने अभ्यास . भविष्याचे भाकीत . बघा , जग बदललंय एनलॉग पासून डिजिटल झालंय . आणि वेळ आली आहे आपला गणिताचा अभ्यासक्रम एनलॉग पासून डिजिटल होण्याची . पारंपारीक , सलग गणितापासून , अधिक आधुनिक , सुट्या पृथक गणिताकडे . अनिश्चिततेचं गणित , अनियमिततेचं , माहितीचं गणित -- आणि ते म्हणजे संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र . सारांश असा की , आपल्या विद्यार्थानी कलनशास्त्राचे तंत्र शिकण्याऐवजी , मला वाटतं , त्या सर्वांना मध्यापासून प्रमाणित विचलनाचे दोन प्रकार कोणते ते कळणं हे जास्त महत्त्वाचं ठरेल . आणि माझ्या म्हणण्याचा हाच अर्थ आहे . धन्यवाद .
(trg)="15"> Det er risiko .
(trg)="16"> Det er vinst .
(trg)="17"> Det er vilkårlegheit .

(src)="4"> ( टाळ्यांचा कडकडाट )
(trg)="31"> ( Applaus )

# mr/BhT0XnBD94o6.xml.gz
# nn/BhT0XnBD94o6.xml.gz


(src)="1"> सभ्य स्त्री- पुरुषहो , या TED मंचावर आपण अनेक वेळा , नेतृत्वगुण आणि चळवळीची सुरुवात यावर चर्चा करतो . चला तर मग , एक चळवळ पाहू , सुरुवातीपासून शेवटपर्यंत , तीन मिनिटांच्या आत . आणि त्यातून काही धडे मिळवू . सर्वप्रथम तुम्हाला माहितच आहे की एका नेत्याकडे धाडस असावं लागतं , गर्दीत उठून दिसण्यासाठी आणि स्वतःचं हसं करून घेण्यासाठी ! पण तो जे काही करत आहे त्याचं अनुकरण करणं खूप सोप्पं आहे . तेंव्हा हा पहा आला , अतिशय महत्वाचा कार्यभाग असणारा त्याचा पहिला अनुयायी . तोच सर्वांना दाखवून देणार आहे की चांगला अनुयायी कसे व्हावे . आता लक्षात घ्या की नेता त्याला स्वतःच्या बरोबरीचं स्थान देतो . तेंव्हा हे आता एकट्या नेत्याचं कार्य राहिलं नसून ते त्यांचं ( दोघांचं ) झालं आहे . आता पहा , तो त्याच्या मित्रांना बोलावत आहे . जर तुम्ही नीट पाहाल तर पहिला अनुयायी हा खरंतर छुप्या नेतृत्वगुणाचे एक उदाहरण आहे . असं वेगळं उठून दिसण्यासाठीही धाडस लागतं . पहिला अनुयायीच एका एकांड्या शिलेदाराला नेतेपद मिळवून देत असतो .
(trg)="1"> Mine damer og herrer .
(trg)="2"> Her på TED snakkar me mykje om leiarskap og røyrsler
(trg)="3"> Lat oss sjå ei røyrsle bli laga , under 3 minutt og gjere oss nokre konklusjonar .

(src)="2"> ( हशा ) ( टाळ्या ) आणि हा पहा दुसरा अनुयायी आला . आता हा एक वेडा किंवा हे दोन वेडे नाहीत , तर तिघांचा जमाव आहे आणि जमावामध्ये तर कुछ बात है . म्हणजे चळवळ ही लोकांना सामावून घेणारी असावी . फक्त नेता असून उपयोग नाही तर अनुयायी असणं महत्वाचं आहे , कारण तुम्ही पाहाल की नवीन अनुयायी आधीच्या अनुयायांची नक्कल करतात , नेत्याची नव्हे . हे बघा , अजून दोन लोकं आली आणि नंतर लगेचंच आणखी तीन लोकं . आता चळवळीला वेग आला आहे . हाच तो क्रांतीचा क्षण . आणि आता खरी चळवळ सुरु झाली आहे . म्हणजे पहा की जसजशी लोकं सामील होत जातात तसतशी चळवळ कमी धोकादायक होते . मग याआधी कुंपणावरून बघणाऱ्यांनाही तसं बघत बसण्याची गरज उरत नाही .
(trg)="14"> ( Latter ) ( Applaus )
(trg)="15"> Og her kjem ein fylgjesvein til .
(trg)="16"> No er det verken ein eller to galningar

(src)="3"> ( कारण आता ) ते गर्दीत वेगळे उठून दिसणार नाहीत . त्यांचं हसंही होणार नाही . पण त्यांनी घाई केली तर ते एका लक्षवेधी जमावाचा भाग होऊ शकतात .
(trg)="27"> Dei vil ikkje skilje seg ut
(trg)="28"> Dei vil ikkje bli gjort narr av
(trg)="29"> Men dei vil vere " dei kule " om dei skundar seg .

(src)="4"> ( हशा ) म्हणून पुढच्या एका मिनिटभरात तुम्ही पाहाल की , हे सर्व बघे गर्दीबरोबरचं राहणं पसंत करतात . अन्यथा शेवटी त्यांचचं हसू होईल , सामील न झाल्यामुळे ! आणि अशाप्रकारे चळवळ सुरु होते . चला तर मग , यातून काही निष्कर्ष काढू . तर सर्वप्रथम , जर तुम्ही सदरा काढून एकट्या नाचणाऱ्या मुलासारखे असाल , तर तुमच्या पहिल्या काही अनुयायांना स्वतःच्या बरोबरीने वागवण्याचे महत्व लक्षात ठेवा . मग साहजिकच सारे चळवळीसाठी ठरते , न की स्वतःसाठी . बरं , पण इथे एक महत्वाचा धडा आपल्या हातून निसटण्याची शक्यता आहे . लक्षात घेतलं तर सर्वांत मोठ्ठा धडा -- तुम्ही पाहिलं का - - की नेतृत्वगुणाचे उदात्तीकरण केले जाते . हे खरचं आहे की सदरा काढून नाचणारा माणूस पहिला होता . आणि त्यालाच सर्व श्रेय मिळेल . पण खरं पाहता त्या पहिल्या अनुयायानेच त्या एकट्या मुर्खास नेतेपद मिळवून दिलं आहे . म्हणून ´नेते बना´ असं जे आपल्याला सांगितलं जातं , ते फारसं उपयोगी नाहीये . जर तुम्हाला खरोखरचं चळवळ सुरु करायची असेल , तर अनुसरण करायचं धाडस बाळगा आणि अनुसरण कसे करावे हे इतरांना दाखवून द्या . आणि एखादा " वेडा " माणूस काही महान कार्य करताना आढळला , तर बरोबर उभं राहून त्याला सामील होणारी प्रथम व्यक्ती होण्याचं धाडस दाखवा . आणि याकरिता एक सर्वोत्तम ठिकाण म्हणजे TED चा हा रंगमंच ! धन्यवाद !
(trg)="30"> ( Latter )
(trg)="31"> Over det neste minuttet kjem resten til , dei som plar å fyljge straumen .
(trg)="32"> Dei risikerar snart å bli gjort narr av for å ikkje bli med

(src)="5"> ( टाळ्या )
(trg)="47"> ( Applaus )

# mr/GP5fQfuhC55U.xml.gz
# nn/GP5fQfuhC55U.xml.gz


(src)="1"> तुम्हाला काय वाटतय याची मला माहिती आहे . तुम्हाला वाटतय मी चुकलेय कुठेतरी . आणि आता एक मिनिटात कोणीतरी या व्यासपीठावर येऊन मला सोबत घेऊन माझे आसन दाखवण्यास मार्गदर्शन करेल .
(trg)="1"> Eg veit kva de tenkjer .
(trg)="2"> De trur eg har gått feil , og at nokon skal koma på scena om eit minutt og visa meg vegen tilbake til setet mitt .

(src)="2"> ( टाळ्यांचा गजर ) हे मला दुबईत नेहेमीच अनुभवास मिळते . तुम्ही दुबईत सुट्टीवर आलात काय ?
(trg)="3"> ( Applaus )
(trg)="4"> Eg får høyra det heile tida i Dubai .
(trg)="5"> " Er du her på ferie ? "

(src)="3"> ( हास्य ) मुलांना भेटावयास आल्या आहात का ? किती दिवस आहात तुम्ही इथे दुबईत ? खरे तर , आम्हाला आशा आहे तुम्ही काही दिवस रहाल इथे दुबईत . मी तीस वर्षापासून खाडीप्रदेशातमध्ये ( गल्फ मध्ये ) राहतेय आणि शिकवते आहे .
(trg)="6"> ( Latter )
(trg)="7"> " Kome her på besøk til barna dine ? "
(trg)="8"> " Kor lenge skal du vera her ? "

(src)="4"> ( टाळ्यांचा गजर ) आणि या काळात , मी बरेच बदल पाहिले आहेत . आणि ती सांख्यिकी जरा धक्कादायक आहे . मला तुमच्याशी आज बोलायचय ( इतर ) भाषांची हानी आणि इंग्रजीच्या जागतिकीकरणाबाबत मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीबाबत सांगते , ती अबू धाबीत प्रौढांना इंग्रजी भाषा शिकवायची . एक दिवस ती सर्व विद्यार्थ्यांना बागेत निसर्गासंबंधीचे ( इंग्रजी ) शब्द शिकवण्यासाठी घेऊन गेली . पण खरे तर ती स्वतःच स्थानिक झाडांची सर्व अरबी नावे आणि उपयोग शिकून गेली -- त्यांचे उपयोग - वैद्यकीय , सौंदर्यवर्धनातील , स्वयंपाकातील , वनौषधींसंबंधी . हे सर्व ( स्थानिक झाडांचे ) ज्ञान विद्यार्थ्यांना कुठे मिळाले ? त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांपासून - आई , वडील , आजोबा , पणजोबा वगैरे . त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांपासून - आई , वडील , आजोबा , पणजोबा वगैरे . या सर्व पिढ्यांमध्ये ( त्यांच्या भाषेत ) बोलाचाली होणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याची आवशक्यता नाहीये . या सर्व पिढ्यांमध्ये ( त्यांच्या भाषेत ) बोलाचाली होणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याची आवशक्यता नाहीये . या सर्व पिढ्यांमध्ये ( त्यांच्या भाषेत ) बोलाचाली होणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याची आवशक्यता नाहीये . सध्या या भाषा प्रचंड वेगाने मरतायत . सध्या या भाषा प्रचंड वेगाने मरतायत . सध्या या भाषा प्रचंड वेगाने मरतायत . प्रत्येक १४ दिवसात एक भाषा नष्ट होतेय . आणि , याच आजच्या काळात , इंग्रजी ही बिनविरोध जागतिक भाषा आहे .
(trg)="11"> ( Applaus )
(trg)="12"> Og i løpet av den tida , har eg sett mange endringar .
(trg)="13"> Den statistikken er ganske sjokkerande .

(src)="5"> ( इतर भाषा मरण्याचे ) इंग्रजीशी काही संबंध आहे ? मला माहित नाही . परंतु मला हे माहिती आहे की मी बरेच बदल पाहिले आहेत . मी जेंव्हा प्रथम गल्फला आले , मी कुवेतला आले त्या काळात तिथे काम करणे अतिशय कठीण होते फार काळ नाही झाला त्याला ते बहुतेक लवकर झाले . तरीही त्या काळात , ब्रिटीश कौन्सिलने माझी नेमणूक केली इतर २५ शिक्षकांबरोबर आणि आम्ही कोणीही मुस्लीम नसणारे प्रथमच कुवेतच्या शाळेत शिकवणारे शिक्षक होतो . आम्हाला इंग्रजी शिकवण्यासाठी आणले होते कारण सरकारला देशाचे आधुनिकीकरण करायचे होते आणि शिक्षणामार्फत नागरिकांचा विकास करावयाचा होता . अर्थात , यात इंग्लंडचा फायदा झाला त्या गल्फच्या पेट्रोलच्या संपत्तीपासून ठीक आहे . आणि हा प्रमुख बदल मी पहिला आहे - इंग्रजी शिकवणे हे कसे बदलले आहे परस्परहिताच्या आचरणापासून ते♫ आजचा प्रचंड आंतरराष्ट्रीय धंदा होण्यापर्यंत .
(trg)="24"> Kan det vera ein samanheng ?
(trg)="25"> Eg veit ikkje .
(trg)="26"> Men eg veit at eg har sett mange endringar .

(src)="6"> ( इंग्रजी भाषा ) आता परदेशी भाषा म्हणून कुठल्याही शाळेच्या अभ्यासक्रमात नाही . आणि इंग्लंडचा एकटा मक्ता राहिला नाहीये तिच्यावर . आणि इंग्लंडचा एकटा मक्ता राहिला नाहीये तिच्यावर . ती मिळून गेलीय जगातील प्रत्येक इंग्रजी बोलणाऱ्या देशात . आणि का नाही ? शेवटी , अत्युत्तम शिक्षण हे जागतिक विद्यापीठांच्या दर्जेनुसार इंग्लंड आणि अमेरिकेच्या विद्यापीठातच मिळते . इंग्लंड आणि अमेरिकेच्या विद्यापीठातच मिळते . म्हणजे , आता सगळ्यांचे शिक्षण इंग्रजीत हवे हे साहजिकच झाले . पण तुम्ही जर स्थानिक भाषा बोलणारे असाल तर , तुम्हाला परीक्षा पास व्हावी लागणार आता हे बरोबर आहे का ? विधार्थ्याला नकार देणे त्याच्या फक्त ( इंग्रजी ) भाषेवरील क्षमतेवरून ? कदाचित , तो कोणी संगणक शास्त्रज्ञ असेल अतिशय बुद्धीमान उदा : त्याला वकील होण्यासाठी त्याच ( इंग्रजी ) भाषेची गरज आहे ? माझ्या मते नाही . आम्ही इंग्रजी शिक्षक त्या ( स्थानिक भाषा बोलणाऱ्या ) विद्यार्थ्यांना कायम नाकारतो . आम्ही त्यांना नकार देतो . आणि त्याना रस्त्यातच थांबवतो . त्यांची ( शिक्षणाची ) स्वप्ने त्या नकारामुळे ते पूर्ण करू शकत नाहीत . जोपर्यंत त्यांना इंग्रजी येत नाही तोपर्यंत . आता मी हे असे समजावून सांगते . समजा , मी फक्त डच भाषा बोलणाऱ्या एका माणसाला भेटले ज्याच्याकडे कॅन्सरचा उपाय आहे मी त्याला ब्रिटीश विद्यापीठात प्रवेश करावयास/ शिकण्यास आडवेन का ? नाही , बिलकुल नाही . पण खरे तर , आम्ही नेमके तेच ( प्रवेश न देणे ) करतो . आम्ही इंग्रजी शिक्षक हे त्या प्रवेशद्वारावरचे पहारेकरी आहोत . आणि तुम्ही आमचे आधी समाधान केले पाहिजे की तुम्हाला नीटनेटके इंग्रजी येते याचे आता लोकांच्या छोट्या समूहाला एवढी जास्त ताकद देणे हे धोकादायक होऊ शकते . कदाचित हा अटकाव सार्वत्रिक असावा . ठीक आहे . तुम्ही म्हणताय " पण , संशोधनाचे काय ? ते सगळे इंग्रजीमध्ये आहे . " पुस्तके इंग्रजीमध्ये आहेत . संशोधनाची नियतकालिके इंग्रजीमध्ये आहेत . ते स्वपुर्ततेचे भाकीत झाले . ते इंग्रजी आवश्यकतेतून सुरू होते . आणि मग ( चक्र ) चालू राहते . मी हे विचारते - भाषांतराचे काय झाले ? तुम्ही जर इस्लामी सुवर्णयुगाचा विचार केला तर , त्या काळात बरेच भाषांतर झाले . त्यांनी लॅटीन आणि ग्रीकचे भाषांतर अरबी आणि फारसीमध्ये केले . आणि त्याचे भाषांतर युरोपमध्ये जर्मन भाषेत आणि रोमन भाषेत झाले . आणि मग युरोपच्या अंधारमय युगावर प्रकाश पडला . आता मला चुकीचे समजू नका मी इंग्रजी शिकवण्याच्या विरुद्ध नाही सर्व इंग्रजी शिक्षकांनो आपली एक जागतिक भाषा आहे हे मला आवडते . एक जागतिक भाषा असणे ही आजच्या काळाची गरज आहे . पण माझा विरोध आहे त्या भाषेचा उपयोग प्रतिबंध/ अडथळा म्हणून करण्याचा . खरच आपल्याला ६०० भाषा नष्ट करून इंग्रजी किंवा चीनी प्रमुख भाषा करायची आहे का ? आपल्याला यापेक्षा जास्त काहीतरी हवे आहे . आणि याला ( एकभाषीयतेला ) सीमा आहे की नाही ? हि ( एकभाषीयतेची ) पद्धत बुद्धिमत्तेला इंग्रजी किती येते यास जोडते हे खरे तर अवास्तविक आहे .
(trg)="36"> Ikkje berre eit framanspråk på skulepensumet .
(trg)="37"> Og ikkje lenger eit domene for mor England åleine .
(trg)="38"> Det er blitt noko som alle heng seg på , alle engelsktalande nasjonar på jorda .