# mfe/VuqYr9NN4uzC.xml.gz
# mr/VuqYr9NN4uzC.xml.gz


(src)="1"> Bonzour .
(src)="2"> Ki manier ?
(src)="3"> ( Riye )
(trg)="1"> सुप्रभात . कसे आहात ? खूप छान चाललंय , नाही का ? मी एकंदर या प्रकारानं खूप प्रभावित झालो आहे . खरं तर , मी निघालोय .

(src)="7"> ( Riye )
(src)="8"> Trwa tem finn revini dan sa konferans la ki an rapor avek saki mo anvi koze .
(src)="9"> Premie , se sa prev extraordiner de kreativite dan tou bann prezantasion ki nounn gete ek dan tou bann dimounn ki isi .
(trg)="2"> ( हशा ) तीन विषय आहेत , नाही का , या शिबिरात बोलले जाणारे , जे संबंधित आहेत मला जे सांगायचं आहे त्याच्याशी . एक म्हणजे मानवी निर्मितिक्षमतेचा असामान्य पुरावा जो आपल्या सर्व प्रेझेन्टेशन्समधून दिसतो आणि इथल्या सर्व लोकांमध्ये दिसतो . फक्त त्यात वैविध्य आहे आणि वेगळे प्रकार आहेत . दुसरं म्हणजे आपण अशा ठिकाणी येऊन ठेपलो आहोत जिथं काय होणार आहे याची आपल्याला कल्पना नाही , भविष्याबाबत . काही कल्पना नाही यातून काय घडेल . मला शिक्षणक्षेत्रामध्ये स्वारस्य आहे - खरं तर , मला असं दिसतं की प्रत्येकालाच शिक्षणामध्ये रस असतो . नाही का ? मला हे खूप गमतीशीर वाटतं . तुम्ही एखाद्या डिनर पार्टीला गेलात , आणि सांगितलंत की तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करता - खरं सांगायचं तर , तुम्ही डिनर पार्ट्यांना जात नसाल , जर तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करत असाल ( हशा ) तुम्हाला बोलावलं जात नाही . आणि परत परत तर नक्कीच नाही . आश्चर्य आहे . पण जर तुम्ही जात असाल , आणि तुम्ही कोणालातरी म्हणालात , म्हणजे , त्यांनी विचारलं , " तुम्ही काय करता ? " आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करता , तुम्हाला त्यांचा चेहरा थिजलेला दिसेल . जसं काही बाप रे , " माझ्याबरोबरच असं का ? सबंध आठवड्याभरात एकमेव पार्टी मिळाली होती . " ( हशा ) पण जर तुम्ही त्यांना त्यांच्या शिक्षणाबद्दल विचाराल , ते तुम्हाला भिंतीत चिणून मारतील . कारण हे त्या गोष्टींपैकी एक आहे ज्या लोकांना प्रचंड संताप आणतात , बरोबर ना ? धर्म , आणि पैसा आणि अशा इतर गोष्टींप्रमाणं . मला शिक्षणक्षेत्रात खूपच स्वारस्य आहे , आणि मला वाटतं आपल्या सर्वांनाच आहे . त्यामध्ये आपले खूप मोठे हितसंबंध गुंतलेले आहेत , काही अंशी यामुळं की शिक्षणच अशी गोष्ट आहे जी आपल्याला अनिश्चित भविष्यात तारणार आहे . तसा विचार केला तर , या वर्षी शाळेत जाऊ लागणारी मुलं २०६५ मध्ये निवृत्त होतील . कुणालाच कल्पना नाही - गेले चार दिवस कितीही तज्ञ प्रदर्शन चालू असलं तरी - की हे जग कसं असेल पाच वर्षांनंतर . आणि तरीही आपल्याला करायचं आहे त्यांना त्यासाठी प्रशिक्षित . तर ही अनिश्चितता , माझ्या मते , विलक्षण आहे . आणि यापैकी तिसरी गोष्ट अशी की आपण सर्वांनी मान्य केली आहे , मुलांची खरोखर विलक्षण क्षमता - त्यांची नावीन्यपूर्ण क्षमता . म्हणजे बघा , सिरेना काल रात्री किती उत्कृष्ट बोलली , नाही का ? काय काय करु शकली ती . आणि ती अपवादात्मक नमुना आहे , पण मला नाही वाटत , खरंच , की ती बालजगतामध्ये अपवादात्मक आहे . तुम्ही पाहताय एक विलक्षण समर्पित व्यक्ती जिला नैसर्गिक देणगी मिळाली . आणि माझं म्हणणं आहे की , सर्व मुलांकडं प्रचंड कौशल्यं असतात . आणि आपण चक्क निर्दयपणे ती वाया घालवतो . म्हणून मला बोलायचं आहे शिक्षणाबद्दल आणि मला बोलायचं आहे निर्मितीक्षमतेबद्दल . माझा मुद्दा असा आहे की आज निर्मितीक्षमता ही साक्षरतेइतकीच महत्त्वाची आहे शिक्षणामध्ये , आणि आपण तिला समान दर्जा दिलाच पाहिजे .

(src)="45"> Mo konba se ki kreativite zordizour bizin osi inportan ki alfabetism ek ki nou bizin tret li avek mem linportans .
(src)="46"> ( Aplodisman ) Mersi .
(src)="47"> ( Aplodisman )
(trg)="3"> ( टाळ्या ) धन्यवाद . तर , मला एवढंच सांगायचं होतं . खूप आभारी आहे .

(src)="48"> Bon , samem tou .
(src)="49"> Mersi bokou .
(src)="50"> ( Riye )
(trg)="4"> ( हशा ) तर , १५ मिनिटं राहिलीत अजून . तर , माझा जन्म झाला ... नको .

(src)="54"> ( Riye )
(src)="55"> Monn fek tann enn zoli zistwar ek mo kontan rerakont li .
(src)="56"> Li lor enn tifi dan enn klas desin .
(trg)="5"> ( हशा ) नुकतीच मी एक अफलातून गोष्ट ऐकली - मी आवडीनं ती सांगतो - एका छोट्या मुलीची , जी चित्रकलेच्या वर्गात बसली होती . सहा वर्षांची ती मागे , चित्र काढत बसली होती , आणि शिक्षकेचं म्हणणं होतं की या मुलीचं इतर कधीही लक्ष नसतं , आणि या चित्रकलेच्या तासाला मात्र असतं . त्या शिक्षिकेला आश्चर्य वाटलं आणि ती त्या मुलीकडं गेली आणि म्हणाली , " तू कशाचं चित्र काढत आहेस ? " आणि ती मुलगी म्हणाली , " मी देवाचं चित्र काढतीय . " ती शिक्षिका म्हणाली , " पण देव कसा दिसतो ते कुणालाच ठाऊक नाही . " " मग एक मिनिट थांबा " , ती मुलगी म्हणाली .

(src)="64"> ( Riye )
(src)="65"> Kan mo garson ti ena katran dan Langleter -- ofet , li ti ena katran partou .
(trg)="6"> ( हशा ) जेव्हा माझा मुलगा इंग्लंडमध्ये चार वर्षांचा होता - खरं तर , तो सगळीकडंच चार वर्षांचा होता .

(src)="66"> ( Riye )
(src)="67"> Bon , nimport kotsa li ti ete , li ti ena katran sa lane la .
(src)="68"> Li ti pe zwe dan spektak Nativite .
(trg)="7"> ( हशा ) अगदी अचूक सांगायचं झालं तर , कुठेही गेला तरी , तो त्या वर्षी चार वर्षांचा होता . त्यानं नॅटिव्हिटी नाटकात भाग घेतला होता . तुम्हाला आठवतीय का ती गोष्ट ? नाही , ती मोठी होती . एक दीर्घ गोष्ट . मेल गिब्सन यानं त्याचा उत्तरार्ध बनवला होता . तुम्ही तो पाहिला असेलः नॅटिव्हिटी २ . पण जेम्सला जोसेफची भूमिका मिळाली होती , ज्याबद्दल आम्हाला खूप उत्सुकता होती . हे मुख्य पात्रांपैकी एक आहे अशी आमची समजूत होती . टी- शर्ट मधल्या मुलांनी आमची जागा खच्चून भरली होतीः जेम्स रॉबिन्सन जोसेफच्या भूमिकेत !

(src)="79"> ( Riye )
(src)="80"> Li pa ti ena pou koze , me zot konn sa parti kot trwa lerwa vini la ?
(src)="81"> Zot vini avek kado , lor ek lobann .
(trg)="8"> ( हशा ) त्याच्या तोंडी संवाद नव्हते , पण तुम्हाला माहितीय तो प्रवेश जिथं ते तीन राजे येतात . आणि ते घेऊन येतात गोल्ड , फ्रॅन्किन्सेन्स आणि मर्‍ह . हे खरोखर घडलं . आम्ही बसलो होतो आणि मला वाटतं त्यांचा क्रम चुकला , कारण आम्ही नंतर त्या छोट्या मुलाशी बोललो आणि आम्ही म्हणालो ,

(src)="83"> A enn moman mo panse ki zot inn bliye enn sekans parski kan nounn dimann ti garson la apre ,
(src)="84"> " Tou korek ? " , linn reponn , " Wi , kifer ?
(src)="85"> Sa pa ti bon ? "
(trg)="9"> " तुला त्याचं काही वाटत नाही ना ? " आणि तो म्हणाला , " नाही , का ? काही चुकीचं होतं का ? ते फक्त चुकीच्या क्रमानं आले , एवढंच . " असो , तर ती तीन मुलं आली - चार वर्षांची मुलं , डोक्यावर छोटं कापड गुंडाळून - आणि त्यांनी ती खोकी खाली ठेवली , आणि पहिला मुलगा म्हणाला , " आय ब्रिन्ग यू गोल्ड . " आणि दुसरा मुलगा म्हणाला , " आय ब्रिन्ग यू मर्‍ह . " आणि तिसरा मुलगा म्हणाला , " फ्रॅन्क सेन्ट धिस . " ( हशा ) या गोष्टींमधील साम्य हे आहे की मुलं धोका पत्करुन काम करतात . त्यांना माहिती नसेल तर ते अंदाज बांधतील . बरोबर ना ? त्यांना चुकण्याची भिती वाटत नाही . आता , माझं असं म्हणणं नाही की चुका करणं आणि निर्मितिक्षम असणं एकच आहे . आपल्याला हे माहितच आहे की , तुमची चुकायची तयारी नसेल , तर तुम्ही कधीही काहीही नवीन करु शकणार नाही . तुमची चुकायची तयारी नसेल , तर . आणि प्रौढत्वाप्रत येईपर्यंत बहुतांश मुलं ही क्षमता गमावून बसतात . त्यांना चुकण्याची दहशत बसते . आणि जाता जाता सांगतो , आपण आपले उद्योग असेच चालवतो . आपण चुकांना बोल लावतो . आणि आता आपण चालवतो राष्ट्रीय शिक्षण यंत्रणा जिथं चुका करणं सर्वात खराब समजलं जातं . आणि परिणामतः आपण लोकांना शिक्षित करतोय त्यांची निर्मितिक्षमता घालवून . पिकासो एकदा असं म्हणाला . तो म्हणाला की सर्व मुलं जन्मतःच कलाकार असतात . समस्या आहे ती वाढत्या वयाबरोबर कलाकार म्हणून टिकून रहायची . माझा यावर ठाम विश्वास आहे , की आपण निर्मितीक्षमतेसहित वाढत नाही , आपण तिच्याशिवाय वाढतो . किंवा असं म्हणा , आपण तिला सोडून शिकत राहतो . तर हे असं का आहे ? सुमारे पाच वर्षांपूर्वीपर्यंत मी स्ट्रॅटफोर्ड - ऍव्हॉन इथं रहात होतो . खरं तर , आम्ही स्ट्रॅटफोर्ड वरुन लॉस ऍँजेलीसला रहायला आलो . यावरुन तुम्हाला कल्पना येईल किती निर्विघ्न संक्रमण असेल ते .

(src)="113"> Zot kav imazine kouma sa tranzision la ti fasil .
(src)="114"> ( Riye )
(src)="115"> Ofet , ou ti dan enn landrwa apel Snitterfield zis andeor Stratford , kot Shakespeare so papa ti ne .
(trg)="10"> ( हशा ) खरं तर , आम्ही स्निटरफील्ड नावाच्या गावी रहायचो . स्ट्रॅटफोर्ड च्या बाहेरच , जिथं शेक्सपियरच्या वडिलांचा जन्म झाला . काहीतरी वेगळं वाटतंय का ? मला वाटलं . शेक्सपियरचे वडील ही कल्पनाच कधी केली नव्हती , होय ना ? बरोबर ना ? कारण तुम्ही हीदेखील कल्पना केली नव्हती की शेक्सपियर कधी लहान मूल होता , होय ना ? सात वर्षांचा शेक्सपियर ? मी कधीच कल्पना नव्हती केली . म्हणजे , तो असेल कधीतरी सात वर्षांचा . तो असणार कुणाच्यातरी इंग्रजीच्या वर्गात , नाही का ? किती त्रासदायक असेल ते ?