# ibo/BhT0XnBD94o6.xml.gz
# mr/BhT0XnBD94o6.xml.gz


(src)="1"> Ndi ohaneze , na TED anyi na ekwu maka ichi na otu ibido ihe
(src)="2"> Ka anyi lee anya otu ihe na aga , site na mbido ruo na ngwucha , na ikeji ato ma mutakwa ihe ona akuzi
(src)="3"> Nke mbu , okwa unu ma na onye na edu kwesiri igbasike ime ihe ndi ozo ga eji chia ya ochi . mana ihe o na eme di mfe iso
(trg)="1"> सभ्य स्त्री- पुरुषहो , या TED मंचावर आपण अनेक वेळा , नेतृत्वगुण आणि चळवळीची सुरुवात यावर चर्चा करतो . चला तर मग , एक चळवळ पाहू , सुरुवातीपासून शेवटपर्यंत , तीन मिनिटांच्या आत . आणि त्यातून काही धडे मिळवू . सर्वप्रथम तुम्हाला माहितच आहे की एका नेत्याकडे धाडस असावं लागतं , गर्दीत उठून दिसण्यासाठी आणि स्वतःचं हसं करून घेण्यासाठी ! पण तो जे काही करत आहे त्याचं अनुकरण करणं खूप सोप्पं आहे . तेंव्हा हा पहा आला , अतिशय महत्वाचा कार्यभाग असणारा त्याचा पहिला अनुयायी . तोच सर्वांना दाखवून देणार आहे की चांगला अनुयायी कसे व्हावे . आता लक्षात घ्या की नेता त्याला स्वतःच्या बरोबरीचं स्थान देतो . तेंव्हा हे आता एकट्या नेत्याचं कार्य राहिलं नसून ते त्यांचं ( दोघांचं ) झालं आहे . आता पहा , तो त्याच्या मित्रांना बोलावत आहे . जर तुम्ही नीट पाहाल तर पहिला अनुयायी हा खरंतर छुप्या नेतृत्वगुणाचे एक उदाहरण आहे . असं वेगळं उठून दिसण्यासाठीही धाडस लागतं . पहिला अनुयायीच एका एकांड्या शिलेदाराला नेतेपद मिळवून देत असतो .

(src)="8"> Ugbu a , unu ga ahu na onye na eso na mbu buzi ezigbo onye isi na onwe ya ona bu inwe obi ikwu cha puta otu anwu onye izizi na eso bu onye gbanwe onye noru onwe ya to onye ndu ( imu amu ) ( iku aka ) onye nke ibou na eso abia kita oburuzi ofu onye or nmadu abou , nmadu ato bu igwe , igwe bu news so iga na iru ga bu na iro odi nkpa , not just igosi onye na edu , mana igosi ndi na eso maka na ndi ofu na eso na eso ndi na eso , not onye na edu kita , odi nmadu nabu na abia and ozugbo nmadu ito more kita anyi weh momentum .
(src)="9"> Oge anu wa ka anyi akwuru kita ka anyi ga agawu ibido so , nee ka ndi nmadu na join odi less risky ndi kno ani na fence , kita nwe reason not to ha ama kwuchapu ha ama di ridiculed mana ha ga abu ofu na ime igwe ma ha gasia ike ( imu amu )
(trg)="2"> ( हशा ) ( टाळ्या ) आणि हा पहा दुसरा अनुयायी आला . आता हा एक वेडा किंवा हे दोन वेडे नाहीत , तर तिघांचा जमाव आहे आणि जमावामध्ये तर कुछ बात है . म्हणजे चळवळ ही लोकांना सामावून घेणारी असावी . फक्त नेता असून उपयोग नाही तर अनुयायी असणं महत्वाचं आहे , कारण तुम्ही पाहाल की नवीन अनुयायी आधीच्या अनुयायांची नक्कल करतात , नेत्याची नव्हे . हे बघा , अजून दोन लोकं आली आणि नंतर लगेचंच आणखी तीन लोकं . आता चळवळीला वेग आला आहे . हाच तो क्रांतीचा क्षण . आणि आता खरी चळवळ सुरु झाली आहे . म्हणजे पहा की जसजशी लोकं सामील होत जातात तसतशी चळवळ कमी धोकादायक होते . मग याआधी कुंपणावरून बघणाऱ्यांनाही तसं बघत बसण्याची गरज उरत नाही .

(src)="10"> So , over the next minute
(src)="11"> Iga afu ndi ga a prefer ikwu with igwe maka eventually ha ga adi ridiculed maka na ha a joinuro and otu anwo ka ige esi abido ihe mana kanyi che maka ihe anyi mu ta ife izizi , obu na gi di ka onye anwu na ehiro efe na agba eqwu na onwe ya rota na odi nmkpa nurturing ndi izizi na eso gi ka unu abu ogbo so , obu maka ibodo ihe and not gi
(src)="12"> Okay , mana anyi we ike ilofu ihe anyi na amu eba nukwu te ihe akuzi , if you noticed obu na ige nti -- bu na idu di over- glorified na , yes , obu onye na ehiro efe bu uzo nya na ewuru afa nine mana obu onye izizi na iso uzo ga atuhari ofu onye ka oburu onye ndu so , ka ha gwaru anyi na anyi nine ga abu ndi ndu ihe anwu enwero isi obu na odi gi ka ifu ibido ihe inwe ume weh soru yana igosi ndi nmadu uzo and oge ifu onye noru onwe ya na eme ihe di egwu nweru obi ibu onye izizi ikwuru oto na ibanye owero ebe ka nma ime ya na aburo , TED . daru ( iku aka )
(trg)="4"> ( हशा ) म्हणून पुढच्या एका मिनिटभरात तुम्ही पाहाल की , हे सर्व बघे गर्दीबरोबरचं राहणं पसंत करतात . अन्यथा शेवटी त्यांचचं हसू होईल , सामील न झाल्यामुळे ! आणि अशाप्रकारे चळवळ सुरु होते . चला तर मग , यातून काही निष्कर्ष काढू . तर सर्वप्रथम , जर तुम्ही सदरा काढून एकट्या नाचणाऱ्या मुलासारखे असाल , तर तुमच्या पहिल्या काही अनुयायांना स्वतःच्या बरोबरीने वागवण्याचे महत्व लक्षात ठेवा . मग साहजिकच सारे चळवळीसाठी ठरते , न की स्वतःसाठी . बरं , पण इथे एक महत्वाचा धडा आपल्या हातून निसटण्याची शक्यता आहे . लक्षात घेतलं तर सर्वांत मोठ्ठा धडा -- तुम्ही पाहिलं का - - की नेतृत्वगुणाचे उदात्तीकरण केले जाते . हे खरचं आहे की सदरा काढून नाचणारा माणूस पहिला होता . आणि त्यालाच सर्व श्रेय मिळेल . पण खरं पाहता त्या पहिल्या अनुयायानेच त्या एकट्या मुर्खास नेतेपद मिळवून दिलं आहे . म्हणून ´नेते बना´ असं जे आपल्याला सांगितलं जातं , ते फारसं उपयोगी नाहीये . जर तुम्हाला खरोखरचं चळवळ सुरु करायची असेल , तर अनुसरण करायचं धाडस बाळगा आणि अनुसरण कसे करावे हे इतरांना दाखवून द्या . आणि एखादा " वेडा " माणूस काही महान कार्य करताना आढळला , तर बरोबर उभं राहून त्याला सामील होणारी प्रथम व्यक्ती होण्याचं धाडस दाखवा . आणि याकरिता एक सर्वोत्तम ठिकाण म्हणजे TED चा हा रंगमंच ! धन्यवाद !