# an/FhK0RB0fPhUs.xml.gz
# mr/FhK0RB0fPhUs.xml.gz


(src)="1"> En primeras , o web yera simple , connectau ubierto , seguro disenyau como una fuerza ta o bien y se tornaría en bella cosa encara muito mas gran un ecosistema plen de vida a lo servicio d 'a humanidat un recurso publico ta la innovación y ta la oportunidat
(src)="2"> Un puesto a on fer realidat os tuyos suenios .
(src)="3"> Pero , en ixos primers días como en qualsiquier atro ecosistema o Web precisaba d' atención .
(trg)="1"> सुरुवातीला वेब ( जागतिक जाल ) साधे होते , जुळलेले होते खुले , सुरक्षित चांगल्याला बळ पुरवण्यासाठी निर्माण केलेले ते याहूनही उत्कृष्ट होऊ शकते . एक जिवंत , श्वासोच्छवास करणारी परिसंस्था मानवतेच्या सेवेसाठी नवीन शोध लागण्यासाठी सार्वजनिक स्त्रोत आणि संधी एक जागा- तुमची स्वप्नं निर्माण करण्यासाठी पण त्या सुरुवातीच्या दिवसांत एखाद्य परिसंस्थेप्रमाणेच वेब ला संगोपनाची आवश्यकता होती . जशीजशी त्याची वाढ होत गेली , उपभोक्त्यांना नवनव्या समस्या जाणवू लागल्या . पॉप - अप्स . व्हायरस . निवडीचे स्वातंत्र्य नसणे . भिंतींनी बंदिस्त असणारी मजकुराची उद्याने . हे वेब जाळे विरत होते . हे मंद , क्लिष्ट , घाबरवणारे होते . उपभोक्ते विचारू लागले ... वेब म्हणजे " हे " ? वेब याहून चांगले असू शकते का ? कोडिंग करणारे , डिझाईन करणारे , विचारवंत यांनी अंतर्भूत असलेला लोकांचा लहान समूह विश्वास ठेवत होता की असू शकते . त्यांच्याकडे एक साहसी कल्पना होती . की एक लहानशी बिना- नफा आणि जागतिक कम्युनिटी( समाज ) काहीतरी जास्त चांगले निर्माण करू शकते . आणि नवीन कल्पना आणि संशोधने वेब वर आणू शकते . त्यांनी याला मोझिला प्रोजेक्ट( प्रकल्प ) असे म्हटले . त्यांनी एक नवीन प्रकारचा वेब ब्राउझर बनवून सुरुवात केली . ज्याला आपण आज फायरफॉक्स नावाने ओळखतो . आणि त्यांनी याला विना- नफा बनवले . त्यामुळे जे लोक वेब वापरत होते त्यांना नेहमीच प्राधान्य दिले गेले . एका सॉफ्टवेअर पेक्षा हे एक व्यासपीठ अधिक होते . जे कोणीही त्यांच्या कल्पनांवर उभारणी करण्यासाठी वापरू शकते . त्रास कमी झाले . आज आपल्याला माहित असलेल्या वेब च्या पायाभूत संकल्पना निर्माण होऊ लागल्या आता वेब ही अशी जागा आहे जेथे तुम्ही कल्पना करू शकता अशा जवळजवळ सगळ्याची निर्मिती करू शकता मोझिला आणि फायरफॉक्स ही संधी लोकांना देण्यासाठीच निर्माण झाले आहेत . आणि उपभोक्त्यांच्या वतीने उभे राहण्यासाठी, जेथे निवड आणि ताबा बऱ्याच वेळा धोकादायक असतात . पण फायरफॉक्स जर फक्त सुरुवात असेल तर ? जर हा एका महाकाय गोष्टीचा भाग असेल तर ? उपभोक्त्यांची वैयक्तिकता आणि फायरफॉक्स भ्रमणध्वनी पासून ते अॅप्स आणि आयडेंटिटी आम्ही वेब च्या मर्यादा दररोज दूर करत आहोत . आणि आम्ही सॉफ्टवेअरच्याही पलीकडे जात आहोत . आम्ही वेब निर्माण करणाऱ्यांची पिढी घडवायला मदत करत आहोत . आमचा विश्वास आहे कि वेब ही अशी जागा आहे जेथे कोणीही आपली स्वप्नं उभारू शकतो . म्हणूनच आम्ही फायरफॉक्स बनवतो . म्हणूनच हजारो स्वयंसेवक आमची उत्पादने तयार करायला मदत करतात . म्हणूनच जगातील लाखो लोक आमचे सॉफ्टवेअर वापरतात . पण सर्वात महत्वाचे म्हणजे - ज्यासाठी आम्ही तुम्हाला नेहमीच प्राधान्य देतो . आणि जे देत नाहीत त्यांच्याविरुद्ध उभे राहतो . लाखो लोक आम्हाला मोझिला फायरफॉक्स साठी ओळखतात . पण आम्ही याहून खूपच जास्त आहोत . आम्ही विना- नफा आहोत . आपण सर्वं प्रेम करत असलेल्या वेब ला वाचवण्यासाठी संघर्ष करत आहोत . आमच्यात सहभागी व्हा - आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे . आजच देणगी द्या .